Actress Wedding 2023 : बी-टाऊनच्या ‘या’ अभिनेत्रींनी सात फेरे घेऊन बांधली लग्नगाठ

Actress Wedding 2023
Actress Wedding 2023
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२३ या वर्षात बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी आपल्या आवडत्या जोडीदाराशी लग्नगाठ बांधली. (Actress Wedding 2023) सिंगल स्टेटस असणाऱ्या अभिनेत्रींनीही अनेक ट्रोलर्सचे तोंड बंद केले. मसाबा गुप्ता, स्वरा भास्कर, कियारा, अथिया शेट्टी अशा 'बॉलिवूड दिवा'नी २०२३ च्या वर्षा विवाहबद्ध झाल्या.  (Actress Wedding 2023)

कियारा आडवाणी -सिद्धार्थ मल्होत्रा

बॉलिवूडचे मोस्ट लवेबल कपल सिद्धार्थ आणि कियाराने ७ फेब्रुवारी २०२३ ला राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सूर्यगढ पॅलेसमध्ये रॉयल लग्न केले होते.

अथिया शेट्टी-के एल राहुल

२३ जानेवारी २०२३ रोजी केएल राहुल आणि अथिया शेट्टीने खंडाळाच्या बंगल्यात लग्न केले होते.

परिणीती चोप्रा-राघव चड्ढा

परिणीती आणि राघव चड्ढा यांचे लग्न २४ सप्टेंबर २०२३ रोजी उदयपूर येथील हॉटेल लीला ॲण्ड ताज पॅलेसमध्ये झाले होते.

स्वरा भास्कर-फहाद अहमद

स्वरा भास्करने आपला लॉन्ग टाईम फ्रेंड फहाद अहमदसोबत १६ फेब्रुवारी २०२३ रोजी कोर्ट मॅरिज केले होते.

मसाबा गुप्ता-सत्यदेव मिश्रा

अभिनेत्री नीना गुप्ताची मुलगी मसाबा गुप्ताने तिचा मित्र सत्यदेव मिश्रासोबत २७ जानेवारी, २०२३ रोजी कोर्ट मॅरिज केले होते.

रणदीप हुड्डा-लिन लॅशराम

रणदीप हुड्डाने त्याची लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड अभिनेत्री लिन लॅशरामसोबत २९ नोव्हेंबर रोजी विवाह केला. मणिपूर पारंपरिक रितीरिवाजानुसार दोघे लग्नबंधनात अडकले होते.

अभिषेक पाठक-शिवालिका ओबेरॉय

दिग्दर्शक अभिषेक पाठक आणि खुदा हाफिज फेम अभिनेत्री शिवालिका ओबेरॉयने ९ फेब्रुवारी, २०२३ रोजी गावामध्ये लग्न केले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news