Five States Assembly Election 2023: पाच राज्‍यांमधील निवडणूक निकालांवरील आनंद महिंद्रांचं ट्वीट चर्चेत!

आनंद महिंद्रा (संग्रहित छायाचित्र )
आनंद महिंद्रा (संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीचा आज (दि. ३ डिसेंबर ) निकाल जाहीर होत आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निकालावर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केले आहे. त्यांचे ट्विट सध्या चर्चेत आहे. (Five States Assembly Election 2023)

आनंद महिंद्रा यांनी निवडणूक निकालाचा फोटो शेअर करत, केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "कोणताही खेळ किंवा ब्लॉकबस्टर चित्रपटापेक्षा कृतीशील लोकशाही ही अधिक आकर्षक आणि रोमांचकारक आहे."

विधानसभा निवडणूक निकालाबाबत सर्वसामान्य जनतेसह,  उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींना देखील या निकालाची किती उत्सुकता आहे हे दिसत आहे. (Five States Assembly Election 2023)

MP मध्ये शिवराज सिंह चौहान पाचव्यांदा CM बनण्याच्या वाटेवर

मध्य प्रदेशातील २३० जागांचे निकाल आज रविवारी (दि.२) जाहीर होत आहे. मध्य प्रदेशात पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची जादू दिसून आली आहे. द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशात भाजपने १५० च्यावर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ७४ जागांवर आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलानुसार, मध्य प्रदेशात भाजपला यश मिळत असल्याचे दिसत असल्याने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी X वर पोस्ट करत 'भारत माता की जय, जनता जनार्दन की जय' असा नारा दिला आहे.

राजस्थानमधील १९९ पैकी ८१ जागांवर भाजप आघाडीवर

राजस्थानात परंपरा कायम राहणार की, काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. निवडणुक आयोग निकालाच्या ट्रेंडनुसार, भाजप ८१ जागांवर, तर काँग्रेस ६० जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पिछाडीवर पडताना दिसत आहे. यावरून 'राजस्थानात 'जादुगारा'ची जादू संपली आहे, असा टोला भाजपने काँग्रेसला दिला आहे.

छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस-भाजपमध्ये 'टी-20' सारखा 'थरार'

छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणीत पहिल्या अडीच तासात क्रिकेट 'टी-20' मधील थरारासारखी आकडेवारी समोर येत आहे, राज्यात विधानसभेच्या ९० जागा आहेत. यापैकी ४५-४५ जागांवर भाजप आणि कॉंग्रेस आघाडीवर आहे. चार राज्य़ांपैकी सर्वाधिक लक्षवेधी मतमोजणी याच राज्याची ठरली आहे, कारण काही मिनिटांमध्येच दोन्ही पक्ष मतमोजणी समांतर वाटचाल करत आहे.

तेलंगणात काँग्रेसचा बहुमताचा आकडा पार

आतापर्यंतच्या निकालानुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेसने ६२ जागांवर आघाडी घेतली असून बीआरएस पिछाडीवर आहे.

  • काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला, ६२ जागांवर आघाडी
    काँग्रेस ६२, BRS ४४, भाजपा ८, AIMIM ४, इतर १
  • माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिम्हा आंदोळेमध्ये आघाडीवर
    आंदोळेमध्ये काँग्रेसचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह हे प्रतिस्पर्धी बीआरएसच्या चक्रांती किरण यांच्यावर ३,४६५ मतांनी आघाडीवर आहेत.
  • तेलंगणात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
    हैदराबादमध्ये रेवंत रेड्डी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला. सध्याच्या कलानुसार, काँग्रेस ५१ जागांवर, बीआरएस २९ जागांवर आणि भाजप ६ जागांवर आघाडीवर आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news