लोणावळ्यात बसून क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना अटक

file photo
file photo

लोणावळा : लोणावळा परिसरात ग्रामीण भागात असलेल्या आपटी या गावात बसून क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले आहे. या कारवाईत 53 हजारांची रोकड, सहा मोबाइल संच, लॅपटॉप, टॅब असा 2 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी अजय नटवरलाल मिठिया (वय 47 ), रवी रसिकभाई रजाणी (वय 26), निपुल देवासीभाई पटेल (वय 28), जिग्नेश गणेशभाई रामाणी (वय 32), मितेश रमेशभाई सिंधू (वय 27, रा. सर्व रा. राजकोट, गुजरात) यांना अटक करण्यात आली आहे. लोणावळ्या जवळील आपटे गावातील लेक मॅन्शन बंगल्यात भारत विरुद्ध – इंग्लड दरम्यान क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांना मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून पाच सट्टेबाजांना ताब्यात घेतले असून लोणावळा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक निरीक्षक नेताजी गंधारे, शब्बीर पठाण, तुषार पंधारे, विक्रम तापकीर, चंद्रकांत जाधव आदींनी ही कारवाई केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news