पुणे शहरात नवे पाच टाऊनशिप; नव्या बिल्डरांची भूगावला पसंती

पुणे शहरात नवे पाच टाऊनशिप; नव्या बिल्डरांची भूगावला पसंती
Published on
Updated on

दिगंबर दराडे

पुणे : गेल्या काही वर्षांत अडचणीत असलेला बांधकाम व्यवसाय गती घेत असून, नववर्षात रिअल इस्टेटची चलती राहण्याचे संकेत मिळत आहेत. 2023 मध्ये शहरात तब्बल पाच नवे टाऊनशिप उभारण्यात येणार आहेत, त्यामुळे नव्या पन्नास हजार घरांची भर पडणार आहे. भूगावमध्ये चार बांधकाम व्यावसायिकांना, तर बोपदेव घाटाजवळ एका बांधकाम व्यावसायिकाला शासनाने टाऊनशिप बांधण्यास परवानगी दिली आहे.

काही टाऊनशिपचे प्राथमिक काम देखील सुरू झाले आहे. शंभर एकरांवर होणार्‍या या टाऊनशिपमध्ये प्रशस्त रस्ते, अत्याधुनिक सुविधांवर भर देण्यात येणार आहे. बावधन, कोथरूड, बाणेर, पाषाण, सिंहगड रोडला असलेली जागेची कमतरता लक्षात घेता बांधकाम व्यावसायिकांकडून भूगावला अधिकची पसंती मिळत आहे. आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक सर्व सुविधांसह रोजगार, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आदी सर्व गोष्टींचा समावेश या ठिकाणी असणार आहे.

यामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. आयटी कंपन्या, आंतरराष्ट्रीय बँका, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स, विमा कंपन्या, विविध कंपन्यांची कार्यालये येथे असतील. त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, क्रीडासंकुले, शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स, उद्याने यांचाही समोवश असणार आहे.

टाऊनशिपमध्ये काय असेल?

कचरा व सांडपाणी व्यवस्थापन
जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन
कम्युनिटी एंगेजमेंट
रस्ते व वाहतूक नियोजन
प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार
पाणी वितरण व्यवस्था
सौर ऊर्जानिर्मिती व व्यवस्थापन

पुणे वेगाने बदलतंय…
घरखरेदीला मागणी वाढतेय
आयटी, औद्योगिकीकरणाची गतीने होतेय वाढ
बड्या गुंतवणूकदारांच्या अजेंड्यावर

हाऊसकीपिंग व फॅसिलिटी मॅनेजमेंट
ग्रीन कव्हर व लँडस्केपिंग
सुरक्षा
आरोग्य सुरक्षा
प्रशिक्षण व कौशल्य विकसन
तक्रार निवारण
नागरिकांशी संवाद
उत्तम प्रशासन

मोठ्या टाऊनशिपमुळे शहराच्या विकासात निश्चितपणे भर पडणार आहे. शहराच्या पूर्वपट्ट्याचा विकास गतिमान पद्धतीने होत आहे. वेगवेगळ्या सुविधा मिळत असल्याने ग्राहक घरखरेदीला प्राधान्य देत आहेत.

                                                 – सतीश मगर, क्रेडाई, राष्ट्रीय अध्यक्ष

भूगाव परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांनी टाऊनशिप उभारणीला पसंती दिली आहे. या परिसरात नागरिकांकडून देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काही दिवसांपासून घरांच्या किमती स्थिरावत आहेत. भविष्यातील लोकांची मागणी लक्षात घेता विविध ठिकाणी आता टाऊनशिप होतील.

                                                            – संजय काकडे, बांधकाम व्यावसायिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news