पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानातून पुन्हा एकदा गूड न्यूज आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या मादी चित्ता गामिनीने ५ शावकांना जन्म दिला आहे. केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र सिंह यांनी आज ( दि. १० मार्च) त्यांच्या X हँडलवर पोस्ट करुन ही माहिती दिली आहे. यामुळे भारतात जन्मलेल्या शावकांची संख्या 13 वर पोहोचली आहे. ( Five More Cheetah Cubs Born in Kuno National Park )
भारतात आणलेल्या दुसऱ्या चित्त्यांपैकी एक असलेल्या पाच वर्षांच्या गामिनीने आज पाच शावकांना जन्म दिला. केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र सिंह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेतील त्स्वालु कालाहारी रिझर्व्ह येथून आणलेली मादी चित्ता गामिनी हिने आज 5 शावकांना जन्म दिला आहे. यामुळे भारतात जन्मलेल्या शावकांची संख्या 13 वर पोहोचली आहे.सर्वांचे, विशेषत: वन अधिकारी, पशुवैद्यकीय आणि क्षेत्रीय कर्मचारी यांच्या टीमचे अभिनंदन ज्यांनी चित्त्यांसाठी वातावरण सुनिश्चित केले आहे, ज्यामुळे यशस्वी वीण आणि शावकांचा जन्म झाला आहे, असेही त्यांनी आपल्या पाेस्टमध्ये नमूद केले आहे.
दक्षिण आफ्रिकेतून भारतात दुसऱ्या लॉटमध्ये आणलेल्या बिबट्यांपैकी गामिनी आहे. भारतीय भूमीवरील हा चौथा चित्ता वंश आहे. यापूर्वी मादी चिता ज्वालाने दोनवेळा एकूण सात शावकांना जन्म दिला तर ३ जानेवारी रोजी मादी तिचा आशाने तीन शावकांना जन्म दिला आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये शावकांसह चित्त्यांची एकूण संख्या २६ आहे.
हेही वाचा :