श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा पाणीपातळीत पाच फुटाने वाढ | Krishna-Panchganga water level

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा पाणीपातळीत पाच फुटाने वाढ | Krishna-Panchganga water level
Published on
Updated on

नृसिंहवाडी; पुढारी वृत्तसेवा : पाणलोट क्षेत्रात तसेच, कोल्हापूर सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासात येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पाच फुटाने वाढ झाली आहे. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरा समोरील मोठ्या कट्ट्यावर कृष्णा नदीचे पाणी आले आहे. तसेच येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावरील संगमेश्वर मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे.

पावसाचा जोर असल्याने येथील दत्त देवस्थान मार्फत मंदिर परिसरातील साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यास प्रारंभ झाला आहे. गेले तीन दिवस सतत पडत असलेल्या पावसामुळे कृष्णा पंचगंगा नद्या प्रथमच पावसाळ्यात दुथडी भरून वाहत आहेत. नदीकाठची गवती कुरणे पाण्यात गेली आहेत. पावसाचा जोर वाढल्यास पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पावसामुळे बस स्थानक ते मंदिर मार्गापर्यंत काही प्रमाणात दल दल झाली आहे. पाऊस असूनही भाविक दत्त मंदिरात दर्शन घेताना दिसून येत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news