बँकांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा

बँकांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील सार्वजनिक व खासगी बँकांतील कर्मचाऱ्यांसाठी सरसकट पाच दिवसांचा आठवडा करण्याची घोषणा केंद्र सरकारकडून निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केली जाण्याची शक्यता आहे. देशभरातील १५ लाख ४० हजार बँक कर्मचाऱ्यांसाठी ही खूशखबर असेल.

इंडियन बँक्स असोसिएशन आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यात डिसेंबरमध्ये झालेल्या करारानुसार, १७ टक्के पगारवाढीची मागणी मान्य झाली असून, एक एप्रिलपासून ती लागू होईल. या करारात पाच दिवसांच्या आठवड्याचाही निर्णय १८० दिवसांत घ्यावा, असे म्हटले होते. त्यानुसार हा प्रस्ताव आता अर्थ मंत्रालयाकडे गेला आहे. योग्यवेळी म्हणजेच आचारसंहिते आधी त्याची घोषणा केली जाऊ शकते.
देशात १५ लाख ४० हजार बँक कर्मचारी आहेत. त्यात खासगी व सार्वजनिक बँकांसोबतच पेमेंट बँका, स्मॉल फायनान्स बँक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विभागीय व ग्रामीण बँकांत ९५ हजार कर्मचारी आहेत. सध्या रिझर्व्ह बँक, एलआयसीमध्ये आधीपासून पाच दिवसांचा आठवडा आहे. बँक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी मिळते. अत्यावश्यक सेवा कायद्याच्या कलम २५ मध्ये तसे बदल करून पाच दिवसांचा आठवडा त्यांना लागू करता येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news