मासे, खेकड्यांची कोव्हिड टेस्ट

मासे, खेकड्यांची कोव्हिड टेस्ट
Published on
Updated on

बीजिंग : चीनमध्ये कोरोना चाचणी सध्या केवळ माणसापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता तर या देशात मासे आणि खेकड्यांचीही कोव्हिड चाचणी घेण्यात येत आहे. म्हणजेच हे समुद्री अन्‍न आता कोव्हिड -19 परीक्षणातून जात आहे. यासंबंधीचा व्हिडीओ नुकताच साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.

नोव्हेंबर 2019 मध्ये झालेली कोरोना महामारीची सुरुवात अद्यापही संपेनाशी झाली आहे. सध्या हा विषाणू संपूर्ण जगभरात पसरला आहे. लसीकरणामुळे या विषाणूच्या संसर्गावर काही प्रमाणात ब्रेक लागला. मात्र, चीनसह अनेक देशात याचा संसर्ग वाढतच आहे. कोट्यवधी लोकांचे लसीकरण झाले असून हे काम अव्याहतपणे जगभर सुरूच आहे.

कोरोनाच्या पसरणार्‍या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी चीनमध्ये माणसांबरोबरच मासे आणि खेकडे या समुद्री अन्‍नाचीही कोव्हिड टेस्ट होत आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या ट्विटर हँडलवर यासंबंधीचा व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे. यात असे दिसते की, पीपीई किट घातलेले आरोग्य कर्मचारी मासे आणि खेकड्यांची कोरोना चाचणी घेत आहेत. जेणेकरून सी-फूडच्या माध्यमातून कोरोना पसरत आहे का? याची माहिती मिळू शकेल. मात्र, असे जर झाले तर संपूर्ण जगासाठी तो चिंतेचा विषय ठरेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news