गोंदिया जिल्ह्यात हत्तीच्या हल्ल्यात पहिला बळी

file photo
file photo
Published on
Updated on

गोंदिया; पुढारी वृत्‍तसेवा : गडचिरोली जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेल्या हत्तीच्या कळपाने आज (मंगळवार) पहिला बळी घेतला. हत्तीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करताना एकाचा मृत्यू झाला, तर आणखी एक जण जखमी झाला. ही घटना आज सकाळी गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध वनपरिक्षेत्रातील तिडका – जब्बारखेडा गावाजवळ घडली.

काही दिवसांपूर्वीच गडचिरोली जिल्ह्यातून हत्तीच्या कळप गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध परिसरात दाखल झाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. दरम्यान आज सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान तिडका – जब्बारखेडा गावाजवळ काही शेतकऱ्यांनी हत्‍तीचा मार्ग अडवून हूसकावण्याच्या प्रयत्न केला, त्यातच हत्तीच्या हल्ल्यात एक व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाला व एक व्यक्‍ती जखमी झाला.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news