Dhoomam : ‘धुमम’चा नवा धमाका! ‘केजीएफ’-‘कांतारा’च्या निर्मात्यांची घोषणा!

Dhoomam : ‘धुमम’चा नवा धमाका! ‘केजीएफ’-‘कांतारा’च्या निर्मात्यांची घोषणा!

[web_stories title="false" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="See More Web Stories" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="5" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]

पुढारी ऑनलाईन डेस्क : Fahadh Faasil Dhoomam First Look : 'केजीएफ 2' आणि 'कांतारा' हे चित्रपट गेल्या वर्षी सुपरहिट ठरले. त्यांच्या पुढील भागाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र त्याआधी निर्माते आपल्या प्रेक्षकांसाठी एक मोठे सरप्राईज देणार आहेत. हॉम्बल फिल्म्सने आता त्यांच्या आगामी 'धूमम' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. ज्यामध्ये 'विक्रम' आणि 'पुष्पा' सारख्या दमदार चित्रपटांत खलनायकाची भूमिका साकारणारा फहाद फासिल दिसत आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

फर्स्ट लुकने उत्सुकता वाढवली

'केजीएफ 3' आणि 'कांतारा 2' नंतर हॉम्बेल फिल्म्स पुढचा चित्रपट 'धूमम' (Dhoomam) घेऊन येत आहेत. या चित्रपटात फहाद फासिल आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अपर्णा बालमुरली यांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत. मुहूर्ताच्या चित्रीकरणासह चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, लोकांमध्ये या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू झाली. यात भर घालण्यासाठी निर्मात्यांनी नुकताच 'धूमम'चा फर्स्ट लुक रिलीज केला आहे.

आगीशिवाय धूर नाही

निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर 'धूमम'चे (Dhoomam) मनोरंजक फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर फहाद फसिल आणि अपर्णा बालमुरली दिसत आहेत. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आगीशिवाय धूर नाही, ही पहिली ठिणगी आहे. हा आहे #Dhoomam चा फर्स्ट लुक #DhoomamFirstLook.'

मोस्ट अवेटेड 'सालार'ही रांगेत

पवन कुमार दिग्दर्शित धूमम हा टायसनच्या ग्रँड अनाउंसमेंटनंतर मल्याळम चित्रपट उद्योगातील हॉम्बेल फिल्म्सचा दुसरा चित्रपट आहे. धूमम हा मल्याळम, कन्नड, तमिळ आणि तेलुगुसह 4 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. 'धूमम' व्यतिरिक्त हॉम्बल फिल्म्सचा 'सालार' नावाचा चित्रपटही रांगेत आहे.

गेल्या वर्षी हॉम्बेल फिल्म्सने जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि बॉक्स ऑफिसच्या खिडकीवर आपली ताकदही दाखवली. 'केजीएफ 2' आणि 'कांतारा' सारख्या मेगा-ब्लॉकबस्टरसह उद्योगात एक वेगळा मानक स्थापित केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news