Firing in New Mexico : अमेरिकेतील न्यू मेक्सिकोत पुन्हा गोळीबार; ३ ठार २ अधिकारी जखमी

firing in New Mexico
firing in New Mexico

पुढारी ऑनलाइन डेस्क : Firing in New Mexico : अमेरिकेतील वायव्य न्यू मेक्सिको येथे सोमवारी गोळीबार झाला. या घटनेत ३ जण ठार झाले असून २ अधिकारी जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या बदली कारवाईत एक संशयित ठार झाला आहे. फार्मिंगटन पोलिसांनी फेसबुकद्वारे याची अधिक माहिती दिली.

सोमवारी सकाळी ११.०० नंतर (स्थानिक वेळेनुसार) काही वेळाने गोळीबार (Firing in New Mexico) झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यापूर्वीच येथील तीन नागरिक ठार झाले होते. त्यानंतर गोळीबार करणाऱ्यांसह पोलिसांची चकमक झाली. त्यामध्ये एक संशयित मारला गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र, या हल्ल्यात मेक्सिको आणि राज्य पोलिस अधिकाऱ्यांपैकी दोन अधिकारी जखमी झाले आहे. जखमी झालेल्यांना जवळच्या सॅन जुआन प्रादेशिक वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे शहर पोलिस विभागाने दिलेल्या एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. (Firing in New Mexico)

दरम्यान, घटनाप्रसंगी ब्रुकसाइड पार्कच्या परिसरात आणि शहरातील सर्व शाळा ज्याला अधिकारी "प्रतिबंधात्मक लॉकडाउन" म्हणतात त्यावर ठेवण्यात आले होते. जवळपासच्या तीन शाळा आपत्कालीन लॉकडाऊनवर राहिल्या.

Firing in New Mexico : पोलिसांनी घटनेतील मृतांची किंवा जखमींची नावे अद्याप जाहीर केलेली नाही. तसेच गोळीबारापाठीमागील कारण देखील अद्याप स्पष्ट केलेले नाही. तसेच हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाहीत. सध्या तरी अन्य कोणत्याही धमक्या आलेल्या नाहीत. या कारवाईत शहर सॅन जुआन काउंटी आणि राज्य पोलिसांनी सहभाग घेतला.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news