अमेरिकेत गोळीबारात १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

फ्लोरिडाः पुढारी ऑनलाईन

अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात एका शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात १७ शाळकरी विद्यार्थी ठार झाले असून २० जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गोळीबार करणार्‍या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

निकोल्स क्रूज असे त्याचे नाव असून तो १९ वर्षाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबार करणारा विद्यार्थी या शाळेत शिकत होता. मात्र, त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार मारेकर्‍याने शाळेत अगोदर फायर अलार्म वाजवला, त्यामुळे सगळीकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन पळापळ सुरू झाली, त्यानंतर त्याने गोळीबार करण्यास सुरूवात केली. काही विद्यार्थ्यांनी वर्गात लपून बसत आपला जीव वाचवला. 

शाळेतील अधिक्षकांनी सांगितले की, ही एक भयानक घटना आहे. याप्रकारचा हल्ला होईल अशी शाळा प्रशासनाला कोणतीही माहिती नव्हती. गोळीबार करणारा विद्यार्थी १९ वर्षीय असून गोळीबारानंतर तो स्व:ता पोलिसांकडे स्वाधीन झाला. या हल्ल्यातील जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news