Tamil Nadu | तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ९ ठार, ४ इमारती उद्ध्वस्त

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूतील वेंबकोट्टई येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात ९ जण ठार झाले आहेत तर अनेकजण जखमी झाले आहेत, असे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (Tamil Nadu) स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, या स्फोटात फटाक्याच्या कारखान्याजवळील ४ इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.

या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाक्याच्या कारखान्यातील भीषण स्फोटात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. प्राथमिक तपासात हा स्फोट कारखान्याच्या केमिकल मिक्सिंग रूममध्ये झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

गेल्या वर्षी तामिळनाडूतील कृष्णगिरी येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात ३ महिलांसह ८ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेकजण जखमी झाले होते. आता पुन्हा अशीच मोठी दुर्घटना घडली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news