रायगड : रोहा येथील डाय केमच्या गोडाऊनमध्ये आग, आवाजाने परिसर दणाणले

roha
roha

धाटाव औद्योगिक वसाहतीमधील रोहा डाय केम कंपनीच्या युनिटमधील गोडावूनमध्ये दुपारी दिडच्या सुमारास आग लागली आहे. त्यामुळे एकामागून एक स्फोटाची मालिका सुरु झाली. या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून जात प्रचंड धुराचे लोट दिसत होते. यामुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार किशोर देशमुख, पोलिस निरिक्षक प्रमोद बाबर, अग्निशमन दल, एम आय आय डी सी सहाय्यक अभियंता विनीत कांदळगावकर हे घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले. यामध्ये प्राथमिक स्तरावर १ कामगार जखमी झाला असल्याचे समजले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. धाटाव औद्योगिक अग्निशमन दल, रोहा नगरपरिषद अग्निशमन दल, सुप्रीम कंपनीचे अग्निशमन दल यांचे बंब आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत.

प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिनांक ७ जून २०२३ रोजी रोहा एमआयडीसीतील रोहा डायकेम टेकओव्हर केलेली वेलमन कंपनी प्लांट नंबर दोनमधील गोडाऊनमध्ये अचानक आग लागली. सदर दुर्घटनेमध्ये प्रथमदर्शनी प्रयाग हशा डोलकर (वय ३३, रा. खारापटी) हा सकाळी नऊ वाजल्यापासून ड्युटीवर असताना सद्यस्थितीत प्रथमदर्शनी त्याला मार लागल्याने दुखापत होऊन व्यक्तीला ॲम्बुलन्सद्वारे दवाखान्यात ॲडमिट केले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत जखमींना उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे. अनिकेत तटकरे यांनी घटनास्थळी जात परीस्थितीचा आढावा घेतला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news