हिंगोली : वाकोडी इथं झेडपीच्या शाळेला आग; महत्वाच्या कागदपत्रांसह शैक्षणिक साहित्य जळून खाक

कळमनुरी; पुढारी वृत्तसेवा

वाकोडी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला आज दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत शाळेतील महत्वपूर्ण कागदपत्रांसह संगणक आणि इतर शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

या घटनेची वर्दी मिळताच कळमनुरी अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी येवून आग विझवण्यास सुरवात केली. यावेळी ञंब्यक जाधव, सौरब जैन, राहुल सावंत, किशोर हरण, सुनिल वाढवे, विश्वनाथ काकडे, सखाराम ऊबाळे, गजानन सुरोशे, बालाजी सुरोशे, सर्जेराव आढाव, सचिन सोळंके, विनायक व्हंगले, विकास जाधव, नागनाथ कदम, बी.जी. जाधव यांनीही परिश्रम घेतले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news