Fire at ammo dump on Siachen : सियाचीनमधील दारुगोळ्याच्या डंपमध्ये लागलेल्या आगीत लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू, ३ जवान जखमी

Fire at ammo dump on Siachen : सियाचीनमधील दारुगोळ्याच्या डंपमध्ये लागलेल्या आगीत लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू, ३ जवान जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सियाचीन ग्लेशियरवरील निवासी बँकरर्सच्या शेजारी असलेल्या दोरुगोळ्याच्या डंपमध्ये आग लागल्याने एका लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर ३ जवान जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली असल्याची माहिती आहे.
सियाचीन ग्लेशियर येथे बुधवारी पहाटे ही आग लागली. (Fire at ammo dump on Siachen) या आगीत कॅप्टन अंशुमान सिंग गंभीररित्या भाजल्या गेले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. शिवाय, इतर तीन जवानही जखमी झाले आहेत. अंशुमान सिंग यांच्या तुलनेत जवान कमी भाजल्या गेले. त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमी जवानांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल पीएस सिद्धू यांनी दिली आहे. (Fire at ammo dump on Siachen)

अधिकाऱ्यांच्या मतानुसार, कॅप्टन सिंगच्या बंकरजवळील दारूगोळ्याच्या डंपला बुधवारी आग लागली. "त्यांनी अनेक जीव वाचवले आणि आणखी वाचलेल्यांचा शोध घेतला" अधिकाऱ्यांनी सांगितले. अंशुमान सिंग यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी लखनऊ येथे पाठवले जाईल. त्यांच्यावर लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार पार पाडले जातील. (Fire at ammo dump on Siachen) कॅप्टन सिंगचे वडील आरपी सिंग हे सैन्यात कनिष्ठ अधिकारी होते. याबाबत बोलताना ते म्हणाले, "मी जे गमावले ते मी परत मिळवू शकत नाही. पण मला अभिमान आहे की, तो डरपोक नव्हता, त्याने वीरांप्रमाणे बलिदान दिले." (Fire at ammo dump on Siachen)

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news