मोठी बातमी: भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे मागितली ३० लाखांची खंडणी

मोठी बातमी: भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे मागितली ३० लाखांची खंडणी

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे अज्ञाताने ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर हा मेसेज करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांच्या मदतीसाठी परिवर्तन हेल्पलाईन सुरु केली आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. ४) सायंकाळी अज्ञाताने त्यावर एक मेसेज केला. यामध्ये ३० लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली. तसेच, खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news