पुणे: बेकायदेशीर आंदोलन करणार्‍या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह रिक्षा चालकांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे: बेकायदेशीर आंदोलन करणार्‍या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह रिक्षा चालकांविरुद्ध गुन्हा दाखल
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: रॅपीडो बाईक टॅक्सी बंद होण्यासाठी रिक्षा चालकांच्या प्रमुख मागणीसाठी बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समीती पुणे यांनी सोमवारी सकाळपासुन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू केले. या प्रकरणी पोलिसांनी बेकायदेशीर आंदोलन करणार्‍या रिक्षा चालकांसह संघटनेच्या पदाधिकार्‍यांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात केला आहे. एकुण 37 रिक्षा चालक व रिक्षा संघटनांचे पदाधिकारी यांना मंगळवारी अटक करण्यात आली.

आंदोलनकर्ते बघतोय रिक्षावाला फोरम अध्यक्ष डॉ. केशव क्षिरसागर, आम आदमी रिक्षा चालक संघटना अध्यक्ष आनंद अंकुश, पुणे जिल्हा वाहतुक सेवा संघटना संजय कवडे, शिवनेरी रिक्षा संघटना अध्यक्ष अशोक साळेकर, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना अध्यक्ष किशोर चिंतामणी, आरपीआय वाहतुक आघाडी अध्यक्ष अजीज शेख, पी आशिर्वाद रिक्षा संघटना अध्यक्ष फारुक बागवाले, एआयएमआयएम रिक्षा चालक संघटना अध्यक्ष बाबा सैय्यद, शिवा वाहतुक संघटना अध्यक्ष शिवा भोगनळी व इतर रिक्षा संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन पोलिसांनी अशा प्रकारे बेकायदेशीर आंदोलन करू नये, असे अवाहन केले होते. पोलीसांनी केलेल्या अवाहनाला प्रतिसाद देत चक्का जाम आंदोलनामुळे नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणुन महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सदरचे आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला. परंतु उर्वरित इतर रिक्षा संघटनांचे पदाधिकारी हे त्यांच्या आंदोलनावर ठाम राहिल्याने पोलिसांनी त्यांना नोटीस दिल्या होत्या.

रिक्षा संघटनांच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समीती स्थापन करण्यात आली आहे. या बाबत रिक्षा संघटनांना माहीती देऊन जिल्हाधिकारी यांनीही रिक्षा संघटनांना सदरचे आंदोलन करू नये असे अवाहन केलेले होते. परंतु सदर समीतीने तात्काळ निर्णय घेऊन बाईक टॅक्सी ऑनलाईन अ‍ॅप काढून न टाकल्यामुळे रिक्षा संघटनांनी त्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील वाहतुकीस अडथळा

पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक यांनीही रिक्षा संघटनांचे पदाधिकारी यांना रॅपीडो बाईक टॅक्सी अ‍ॅप बंद करणेबाबत कायदेशीर कार्यवाही चालु असल्याचे सांगितले. तसेच बेकायदेशीरपणे चक्का जाम आंदोलन करून सर्व सामान्य नागरीकांना वेठीस धरू नका, असे आवाहनही केले. परंतु रिक्षा संघटना आंदोलनावर ठाम राहिल्या. रिक्षा संघटनांचे पदाधिकारी व सुमारे 900 ते 950 रिक्षाचालक यांनी सोमवारी दिवसभर रस्ता बंद करून आंदोलन करत नागरिकांना वेठीस धरले. त्यामुळे संपुर्ण पुणे शहरामधील वाहतुक विस्कळीत होऊन नागरीकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे या प्रकरणी रिक्षाचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंदोलनकर्ते बघतोय रिक्षावाला फोरम अध्यक्ष डॉ. केशव क्षिरसागर, आम आदमी रिक्षा चालक संघटना अध्यक्ष आनंद अंकुश, पुणे जिल्हा वाहतुक सेवा संघटना संजय कवडे यांच्यासह पाच जणांना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली असल्याचे वरिष्ठ पोलस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news