नाशिक : महसूलच्या बदल्यांना अखेर मुहूर्त

नाशिक : महसूलच्या बदल्यांना अखेर मुहूर्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महसूल विभागात गेल्या दीड महिन्यांपासून रखडलेल्या उपजिल्हाधिकारी संवर्गातील बदल्यांना अखेर मुहूर्त लागला आहे. बदल्यांमध्ये नाशिक जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी स्वाती थविल यांना उपजिल्हाधिकारी (पाटबंधारे क्रमांक-१)पदी नियुक्ती मिळाली. त्यांच्या जागेवर उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांची नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात कार्यरत विठ्ठल सोनवणे यांची विभागीय आयुक्तालयात सहायक आयुक्त (भूसुधार) या पदावर नियुक्ती झाली आहे.

उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे www.pudhari.news
उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे www.pudhari.news

राज्यातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शासनाने रविवारी (दि.१२) काढले. बदल्यांमध्ये नाशिक निवडणूक उपजिल्हाधिकारीपदी मंगरुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगरुळे यांनी यापूर्वी २०१३ ते २०१६ या कालावधीत निफाड प्रांत आणि २०१६ ते २०१९ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (प्रशासन) म्हणून काम पाहिले आहे. २०१९ ते एप्रिल २०२३ काळात संगमनेर प्रांताधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. या कालावधीत त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यावेळी कोरोनाचे संकट असल्यामुळे मंगरुळे हे आईच्या निधनानंतरही अवघ्या दीड दिवसात कर्तव्यावर हजर झाले होते.

नाशिक जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी स्वाती थविल
नाशिक जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी स्वाती थविल

गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात प्रशासक म्हणून कार्यरत असलेले सोनवणे यांची विभागीय आयुक्तालयात सहायक आयुक्तपदी नेमणूक झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते बदली आदेशाच्या प्रतीक्षेत होते. अखेर शासनाने त्यांची सहायक आयुक्त भूसुधार या कुंदन सोनवणे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणाऱ्या जागी नियुक्ती केली. समृद्धी प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यात भूसंपादनापासून ते उद‌्घाटनापर्यंतच्या प्रक्रियेत साेनवणे यांचा मोलाचा हातभार होता.

तहसीलदारांची खांदेपालट

उपजिल्हाधिकाऱ्यांबरोबरच तहसीलदारांच्याही शासनाने बदल्या केल्या आहेत. त्र्यंबकेश्वर तहसीलदारपदी मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचेती यांची नियुक्ती केली आहे. नवापूरचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांची चांदवडला, तर नगरचे पुनर्वसन अधिकारी क्रमांक-१ रोहिदास वारूळे यांची कळवण तहसीलदारपदी नेमणूक करण्यात आली. मालेगाव शहर धान्य अधिकारी दत्तात्रय शेजूळ यांची अपर तहसीलदार साक्री या पदी बदली झाली असून, त्यांच्या जागेवर भुसावळचे तहसीलदार दीपक धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली. खुलताबादचे (छत्रपती संभाजीनगर) तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांची सिन्नर तहसीलदारपदी शासनाने नेमणूक केली आहे.

सहायक आयुक्त विठ्ठल सोनवणे
सहायक आयुक्त विठ्ठल सोनवणे

विभागातील बदल्या अशा…

कुंदनकुमार सोनवणे : सहायक आयुक्त (मावक) नाशिक

शशिकांत मंगरुळे : उपजिल्हाधिकारी (निवडणूक)

स्वाती थविल : उपजिल्हाधिकारी पाटबंधारे क्र-१

नितीन सदगी : उपविभागीय अधिकारी मालेगाव

संजय बागडे : सचिव गानिप्र, ससप्र, नंदुरबार

नितीन गावंडे : निवासी उपजिल्हाधिकारी धुळे

अर्चना जाधव-तांबे : उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. १३ पुणे

संदीप चव्हाण : उपजिल्हाधिकारी संगायो, मुंबई उपनगर

डॉ. विक्रम बांदल : उपविभागीय अधिकारी, विटा, जि. सांगली

डॉ. अर्चना पाठारे : प्रादेशिक अधिकारी-२ एमआयडीसी, पुणे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news