Bhavna Gawli : अखेर भावना गवळी यांची नाराजी दूर; राजश्री पाटील यांच्यासाठी मैदानात

भावना गवळी
भावना गवळी

वाशिम: पुढारी वृत्तसेवा: यवतमाळ – वाशिम लोकसभेच्या ५ वेळा खासदार राहिलेल्या खासदार भावना गवळी यांची नाराजी दूर झाली आहे. त्या महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारात सक्रीय झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या 'अब की बार ४०० पार' हा नारा सत्यात उतरविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराचा झोकून देऊन प्रचार करणार असल्याची माहिती त्यांनी आज (दि.१३) पत्रकार परिषदेत दिली. Bhavna Gawli

भावना गवळी यांना तिकीट डावल्याने त्या नाराज होत्या. महायुतीच्या प्रचारापासून त्या अलिप्त होत्या. दरम्यान, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांची भेट घेऊन नाराजी दूर केली. त्यानंतर गवळी यांनी पत्रकार परिषदेत प्रचारात सक्रीय होत असल्याची माहिती दिली. Bhavna Gawli

त्या पुढे म्हणाल्या की, यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघातील माझे तिकीट कापण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला की, मी नाराज आहे. परंतु एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते की, नाराज होणाऱ्यापैकी मी नाही. तिकीट कापल्याची खंत मला वाटली. इतकी वर्षे काम केल्यानंतर तिकीट नाकारल्याने दु:ख वाटले.

त्यामुळे खंत असल्यामुळे मी प्रचारासाठी बाहेर पडले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत. ते पाहता त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आता मैदानात उतरले आहे. राजश्री पाटील यांच्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी काम करणार आहे.

माझी पुढची राजकीय वाटचाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील. ते देतील ती जबाबदारी मी पार पाडणार आहे. पक्षाची नेता, कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करत राहणार आहे.

– खासदार, भावना गवळी

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news