Sonam Wangchuk Fast Over : ‘लडाखसाठी लढा सुरूच राहणार’, सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे

Sonam Wangchuk Fast Over : ‘लडाखसाठी लढा सुरूच राहणार’, सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sonam Wangchuk Fast Over : सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी मंगळवारी लेहमध्ये 21 दिवसांचे उपोषण ज्यूस पिऊन संपवले. यावेळी हजारो नागरिकांनी आंदोलनस्थळी पोहोचून आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. सोनम वांगचुक म्हणाले की, आता महिला कार्यकर्त्या हे उपोषण इतरांसोबत पुढे नेतील. केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखला सहाव्या अनुसूचीअंतर्गत राज्याचा दर्जा मिळावा आणि घटनात्मक सुरक्षा प्रदान केली जावी, ही आमची मागणी पूर्ण होईपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे.'

सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, इनोव्हेटर आणि शिक्षणसुधारक सोनम वांगचूक यांनी 6 मार्च 2024 पासून लेहमध्ये आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या उपोषणाचे 21-21 दिवसांचे टप्पे केले होते. जोपर्यंत केंद्र सरकार लडाखमधल्या जनतेच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, अशी माहिती सोनम यांनी उपोषणापूर्वीच दिली होती.

उपोषण कशासाठी?

केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखला सहाव्या अनुसूचीअंतर्गत राज्याचा दर्जा मिळावा आणि घटनात्मक सुरक्षा प्रदान केली जावी, अशी मागणी सोनम वांगचुक आणि त्यांचे समर्थक केंद्र सरकारकडे करत आहेत. यासोबत त्यांनी लडाखसाठी लोकसभेच्या दोन आणि राज्यसभेच्या एका जागेची मागणी केली आहे. लडाखमधून लोकसभेत दोन आणि राज्यसभेत एक प्रतिनिधी गेला पाहिजे, अशी सोनम वांगचुक आणि त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. या मागणीसाठी वांगचुक आणि त्यांचे समर्थक 6 मार्चपासून लेहमध्ये उपोषणाला बसले आहेत. या उपोषणापूर्वी 3 फेब्रुवारी रोजी लेहमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news