FIFA World Cup Final : १८ कॅरेट सोन्याची ट्रॉफी; फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीबाबत जाणून घ्या सविस्तर

FIFA World Cup Final : १८ कॅरेट सोन्याची ट्रॉफी; फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीबाबत जाणून घ्या सविस्तर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा वर्ल्डकपच्या ओरिजनल ट्रॉफीचे वजन जवळपास 6.175 किलो इतके आहे आणि ती बनवण्यासाठी 18 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. ट्रॉफीची लांबी 36.8 सेंटिमीटर आणि व्यास 13 सेंटिमीटर इतका आहे. ट्रॉफीच्या बेसवर मॅलाकाईट स्टोनचे दोन स्तर आवरण देण्यात आले आहेत.

1994 साली या ट्रॉफीमध्ये थोडा बदल करण्यात आला आणि विजेत्या संघाचे नाव लिहिण्यासाठी ट्रॉफीच्या खाली एक प्लेट लावण्यात आली. त्यावर यंदा अर्जेंटिना या संघाने आपले नाव कोरले. फायनलमध्ये विजेत्या अर्जेंटिना संघाला 347 कोटी आणि उपविजेत्या संघाला 248 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. फुटबॉल वर्ल्डकपची सुरुवात 1930 साली झाली होती. त्यावेळी विजेत्या संघाला जी ट्रॉफी दिली गेली तिचे नाव 'जूल्स रिमेट ट्रॉफी' देण्यात आले होते. जूल्स रिमेट ट्रॉफी 1970 पर्यंतच चॅम्पियन संघाला दिली गेली. यानंतर वर्ल्डकपची ट्रॉफी नव्याने डिझाईन करण्यात आली. नव्या ट्रॉफीचे काम इटालियन आर्टिस्ट सिल्वियो गजानिया याला देण्यात आले होते. 1974 सालच्या वर्ल्डकपपासून नवी ट्रॉफी दिली जाऊ लागली. जिला 'फिफा वर्ल्डकप ट्रॉफी' नावाने संबोधले जाऊ लागले.

फायनलमध्ये जिंकलेल्या संघाला दिल्या जाणार्‍या ट्रॉफीचीही एक रोमांचक कहाणी आहे. विश्वविजेत्या अर्जेंटिना संघाला ओरिजनल ट्रॉफी फक्त विजयाचे सेलिब्रेशन करण्यापुरतीच देण्यात आली. पुरस्कार सोहळा संपल्यानंतर फिफा अधिकार्‍यांनी अर्जेंटिना संघाकडून खरी ट्रॉफी परत घेतली. याचा अर्थ असा की अर्जेंटिना संघाला खरी ट्रॉफी आपल्यासोबत घेऊन जाता येणार नाही. त्यांना ड्युप्लिकेट ट्रॉफी दिली जाईल. ही ड्युप्लिकेट ट्रॉफी तांब्याने बनवलेली आहे आणि त्यावर सोन्याचे पाणी चढवलेले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news