हरदोई (उत्तर प्रदेश); पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज परिसरात पोलिसांसमोर एका कैद्याने तुफान धिंगाणा घातला. त्याच एकच म्हणण होतं की, पोलिसांनी त्याला एक वचन द्यावे. तो एका मागणीवर अडून बसला होता. तो म्हणत होता की, पोलिस पायावर गोळी का झाडतात. त्यामुळे पहिला मला लिहून द्या की, मला तुम्ही गोळी मारणार नाही, तरच मी पोलिसांसोबत जाईन. यामुळे पोलिसांसमोर नवा पेच निर्माण झाला.
उत्तर प्रदेशात कुख्यात गुंड, आरोपी हे पोलिसांशी चकमकीत जखमी झाले आहेत. त्यावरून हरजोई जेलमध्ये डायलिसिससाठी मेडिकल कॉलेज मध्ये आणलेल्या एका कैद्याने मोठा गोंधळ घालण्यास सुरूवात केली. तो हॉस्पीटल मधून पोलिसांसोबत जेलमध्ये जाण्यास तयार नव्हता. तो एकाच गोष्टीवर अडून बसला होता, ती म्हणजे पोलिसांनी मला लिहून द्यावे की, ते मला रस्त्यात गोळी मारणार नाहीत तरच मी येईन.
कोतवाली पिहानी प्रदेशातील मोहल्ला लोहानीत राहणाऱ्या रिजवानवर आरोप आहे की, त्याने २०१४ मध्ये त्याने पत्नीवर ॲसिडचा हल्ला केला. या ॲसिड हल्ल्यात त्याची पत्नी गंभीर जखमी झाली होती. या घटनेवरून पोलिसांनी रिजवान विरोधात केस दाखल करून रिजवानला जेलमध्ये पाठवले होते.
जामीनावर सुटलेला रिजवान फरार झाला होता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. यानंतर पोलिसांच्या भीतीने त्याने न्यायालयात आत्मसमर्पण केले होते.
हा आरोपी पोलिसांना इतका घाबरलेला होता की, तो दवाखण्यात जाण्यासाठी रुग्णवाहिकेत बसायला देखील तो तयार होईना. यावेळी त्याने गोंधळ घालयाला सुरूवात केली. पोलिसांनी मला गोळी मारू नये म्हणत त्याने पोलिसांना विनंती करायला सुरूवात केली.
त्याचा गोंधळ पाहून आणखी पोलिस त्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र मला गोळी घालणार नाही तुम्ही लिहून द्या या मागणीवर तो ठाम होता.
पोलिसांनी त्याला भरवसा दिला कि, त्याला गोळी नाही मारणार. तरीही तो रूग्णालयात जाण्यास तयार होईना. यानंतर तो कोतवाली शहर पोलिसांच्या जीपमध्ये बसून जिल्हा जेलमध्ये गेला.
पोलिसांनी सांगितले की, हा आरोपीला रूग्णालयात डायलिसिससाठी नेण्यात येत होते. तेंव्हा तो डायलिसिस करण्यासाठी तयार नव्हता. पोलिसांनी समजावल्यानंतर त्याचे डायलेसिस करून त्याला जेलमध्ये पाठवण्यात आले.
हेही वाचा :