पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातच्या वडोदरानजीक महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. रविवारी (दि. ३) रात्री झालेल्या या दुर्घटनेत एका चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Gujarat Accident)
'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातच्या वडोदराजवळील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. अपघातात कारमधील सर्वजण एकाच कुटुंबातील होते. मृतांमध्ये दाेन पुरुष, दाेन महिलांसह एका लहान मुलाचा समावेश आहे. वडोदरा जिल्ह्यातील कर्जन तालुक्यातून परत येत असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. (Gujarat Accident)
यापूर्वी 27 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील ढोलका शहरात वेगवान स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) थांबलेल्या डंपरला धडकल्याने पाच जण ठार आणि दोन जखमी झाले होते. ढोलका पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शहराजवळील महामार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या डंपरला एसयूव्हीने धडक दिल्याने पहाटे 5 वाजता हा अपघात झाला होता.
हेही वाचा