सीबीएसई बोर्डाची संलग्न करण्यासाठी शाळा, कॉलेजला बनावट ना हरकत प्रमाणपत्रे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सीबीएसई बोर्डाची संलग्न करण्यासाठी शाळा, कॉलेजला बनावट ना हरकत प्रमाणपत्रे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शाळा आणि कॉलेज सीबीएसई बोर्डाची संलग्न करण्यासाठी बनावट ना हरकत प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात आता अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिक्षण अधिकारी सुनंदा तुकाराम वाखारे ( 43 पार्क सोसायटी गणपती चौकाजवळ विमान नगर) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आहे हा प्रकार 14 जुलै 2022 पूर्वी जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुनंदा वाखारे या शिक्षणाधिकारी असून जुलै 2022 च्या पूर्वी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या क्रिएटिव्ह एज्युकेशनल सोसायटी संचलित पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, एम पी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज( शिवाजीनगर) व एज्युकेशनल करिअर फाउंडेशन नमो आर आय एम एस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या शाळा आणि कॉलेजला सीबीएसई बोर्डाची संलग्न करण्याबाबतचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार त्यांनी केलेला चौकशीत उघड झाला असून या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करून त्याचा वापर केल्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.  प्राथमिक तपासामध्ये या शाळांची नावे उघड झाली असून आणखी काही शाळांचा सहभाग असण्याची देखील शक्यता आता वर्तवली जात आहे. समर्थ पोलीस अधिक तपास करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news