थंडीचा मुक्काम वाढला; 5 फेब्रुवारीपर्यंत कडाका

थंडीचा मुक्काम वाढला; 5 फेब्रुवारीपर्यंत कडाका

पुणे : हिमालयात पश्चिमी चक्रवात जोरदार सक्रिय झाला आहे. तसेच उत्तर भारतात झोतवार्‍यांचा (जेट स्ट्रीम विंड्स) प्रभाव कायम असल्याने त्या भागातील किमान तापमान अजूनही 2 ते 5 अंशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात शीतलहरींचा प्रभाव कायम आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट राहील. मात्र, कोकण व मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर किंचित कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हिमालयात पश्चिमी चक्रवात सतत सक्रिय आहे. त्यामुळे काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश ते मध्य प्रदेशपर्यंत थंडीची लाट तीव्र आहे. त्याचा परिणाम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात दिसेल.

राज्याचे रविवारचे किमान तापमान गोंदिया 10.2, जळगाव 10.8, मालेगाव 10.6, नाशिक 12.5, पुणे 13.3, चंद्रपूर 11, नागपूर 11.6, वाशिम 11.8, छत्रपती संभाजीनगर 13.6, मुंबई 20.7, कोल्हापूर 18.1, महाबळेश्वर 14.5, सांगली 17.4, सातारा 15, सोलापूर 18.4, धाराशिव 17.4, परभणी 14.0, नांदेड 15.8, अकोला 14.5, अमरावती 13.6, बुलडाणा 14.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news