नाशिकमध्ये बंद गाळ्यात मानवी अवयव सापडल्याने खळबळ

नाशिकमध्ये बंद गाळ्यात मानवी अवयव सापडल्याने खळबळ

नाशिक ; पुढारी वृत्तसेवा

मुंबई नाका येथील पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या हरी विहार सोसायटीच्या बंद गाळ्यामध्ये मानवी अवयव सापडल्याने खळबळ उडाली आहे. एका बादलीमध्ये केमिकल प्रक्रिया करून ठेवलेले आठ मानवी कान आढळून आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे गाळे पंधरा वर्षापासून उघडण्यात आले नव्हते. पंधरा वर्षांपूर्वी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना भाडेतत्त्वावर हे गाळे देण्यात आले होते. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस तपास करीत आहेत. दरम्या रात्री घटनास्थळी फॉरेन्सिक डॉक्टरांची टीम दाखल झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कान, नाक, घसा तज्ञ डॉ. किरण शिंदे यांच्या आईच्या नावे तो गाळा आहे. डॉ. शिंदे यांनी सरावासाठी 2005 मध्ये मुंबई येथून कानाचे अवशेष आणलेले होते. मात्र गाळ्याची चावी हरवल्याने त्यांनी गाळा उघडला नव्हता. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत. मानवी अवशेष बाळगता येतात का याची शहानिशा पोलिस करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news