जळगाव कोर्टात सलग दुसऱ्या दिवशी खळबळ ; तरुणाकडे आढळला चॉपर

जळगाव कोर्टात सलग दुसऱ्या दिवशी खळबळ ; तरुणाकडे आढळला चॉपर

जळगाव : येथील न्यायालयाच्या आवारात गावठी कट्टा आणि काडतूस आढळल्याची घटना काल (दि. २०) घडली होती. खूनाच्या आरोपीची हत्या करण्याच कट असल्याचे उघड झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर आज (दि. २१) पुन्हा एका संशयित आरोपीसोबत असलेल्या तरुणाकडे धारदार शस्त्र आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे संभाव्य धोका टळला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिवाजीनगरातील राकेश सपकाळे खून खटल्यातील संशयित आरोपींना पोलिसांनी जिल्हा न्यायालयामध्ये तारखेवर हजर केले होते. या ठिकाणी संशयित आरोपींना भेटण्यासाठी काही तरुणांनी गर्दी केली होती. याच वेळेला एका तरुणाकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने धाव घेत संबंधित तरुणावर कारवाई करण्यात यश मिळवले. चंद्रकांत राजकुमार शर्मा (वय २६, रा. कांचन नगर) या तरुणाकडे चॉपर आढळल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले. जळगाव शहर पोलीस स्थानकातील गजानन बडगुजर, एलसीबीचे प्रीतम पाटील, विजय पाटील, राजू मेढे, संजय शिवरकर, संतोष मायकल आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news