Drug Addiction : ड्रग्जची नशा नेमकी असते कशी? 

Drug Addiction : ड्रग्जची नशा नेमकी असते कशी? 
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट यांची नावं सध्या माध्यमांमध्ये चांगलीच चर्चेत आहेत. क्रूझवरील ड्रग्ज पार्टी यांना (Drug Addiction) चांगलीच महागात पडली आहे. यात प्रामुख्याने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान केंद्रस्थानी आहे. या हायप्रोफाईल लोकांना आकर्षित करणाऱ्या ड्रग्जची नशा नेमकी असते कशी, हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे आपण आज ड्रग्जच्या नशेबद्दल जाणून घेणार आहोत.

ड्रग्जचा सोपा अर्थ आहे तो म्हणजे औषधं. विशिष्ट रोगांसाठीच ड्रग्ज घेण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. डाॅक्टरांच्या परवानगीशिवाय ड्रग्ज (Drug Addiction) घेणं भारतात कायदेशीर गुन्हा आहे. पण, ड्रग्जची नशा नेमकी कशी असते? जर ड्रग्जचं व्यसन लागलं तर त्यापासून सुटका कशी करून घ्यायची? मूळात ड्रग्जचं व्यसन लागतं कसं, हे पाहणं जास्त महत्वाचं आहे.

ड्रग्जचं व्यसन लागतं कसं? 

दारू, तंबाखू, सिगारेट ओढणे, शी व्यसनं करण्याच्या सवयी माणसाला लागतात. त्यातून इच्छा असूनदेखील माणूस ही व्यसनं सोडू शकत नाही. अगदी तसंच ड्रग्जच्या बाबतीत होतं. एकदा का ड्रग्जचं व्यसन लागलं की, त्यातून सुटका होणं खूप अशक्‍य असतं. सुरुवातीला ड्रग्ज घेताना संबंधित व्यक्ती ती प्रोसेस एन्जाॅय करत असतो. नंतर त्याला हळूहळू त्याची सवय लागते; मग त्यातून बाहेर पडणं कठीण होतं… व्‍यसनाची नशा इतकी पराकाेटीला जाते की, दोनच पर्याय त्या व्यसनी माणसापुढे असतात. एक ड्रग्ज घ्यायचं किंवा मृत्यू स्वीकारायचा. याचा अर्थ असा की, ड्रग्जचं व्यसन सोडू शकत नाही आणि सोडलं तर त्याचा मृत्यू होऊ शकतो.

ड्रग्जचं व्यसन जडलेल्या माणसाला वेळेवर ड्रग्ज मिळाले नाहीत तर त्याच्या शरीरात विशिष्ट बदल होऊ लागतात. त्याची प्रचंड चिडचीड होते, त्याला खूप राग यायला लागतो. इतकंच नाही तर त्याला झटके येऊ लागतात. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, ड्रग्ज ही मानसिक समस्यांवर जसे की, स्ट्रेस आणि एंग्जाइटी यावर उपयुक्त असते. पण, यावर डाॅक्टरांशी बोलल्यानंतरच विश्वास ठेवावा. तसं पाहिलं तर ड्रग्जचं व्यसन सोडविण्यासाठी खूप उपचार पद्धती आलेल्या आहे. तर ड्रग्जचं व्यसन कसं सोडायचं ते पाहू…

'संजू' नावाच्या चित्रपटात रणबीर कपूरने ड्रग्ज सोडल्यानंतर उदासिन राहायला लागतो. त्याचा आत्मविश्वास कमी होतो. जे विचार त्याला छळत असतात, ते विचार पुन्हा त्याचावर अतिक्रमित होतात. यालाच निरुत्साही वागणं (Disinhibited behaviour) असं म्हणतात. पण, जेव्हा अशा व्यक्तीला ड्रग्ज मिळतात तेव्हा तातडीने त्याच्यामध्ये आत्मविश्वास जागृत होतो. झोप, थकणे, अस्वस्थपणा आणि भीती ड्रग्जने कमी होते. पण, हे सगळं नकारात्मक कामांसाठी वापरलं जातं.

ड्रग्जच्या व्यसन कसं सोडायचं? 

१) ड्रग्जचं व्यसन सोडणं, तशी सोपी गोष्ट नाही. जर तुमच्या आसपास ड्रग्जचं व्यसन करणारा व्यक्ती असेल तर त्याला त्याच्या परिणामांविषयी सांगून ड्रग्जच्या व्यसनापासून दूर होण्यास परावृत्त करा.

२)  ड्रग्जचं व्यसन सोडण्यासाठी त्याला मोटिव्हेट करून ड्रग्ज घेण्याचे तोटे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव करून देऊ शकता.

३) भारतात अनेक ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्रं आहेत. त्या केंद्रांमध्ये अशा व्यक्तींना भरती करून हे व्यसन सोडू शकतो. यामध्ये संबंधित व्यसनी व्यक्तीवर काही पद्धती (थेरेपी) देऊन ड्रग्ज व्यसन सोडू शकता.

पहा व्हिडीओ : कोरोनाचा Heart Attack आणि Brain Hemorrhageशी काय संबंध?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news