T20 WC Final : पाकिस्तानचा धुव्वा उडवत इंग्लंडने जिंकला टी 20 वर्ल्ड कप!

T20 WC Final
T20 WC Final
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि 5 विकेट्स राखून विजेतेपद पटकावले. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने इंग्लंडसमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात इंग्लडने बेन स्टोक्सच्या झुंझार अर्धशतकाच्या (नाबाद 52) जोरावर 19 षटकांमध्ये 5 गडी गमावून 138 धावांचे लक्ष्य गाठले. याचबरोबर इंग्लंडचा संघ टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा दुहेरी विश्वविजेता ठरला आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे जेतेपदही सध्या इंग्लंडकडे आहे. प्रथमच, एका संघाने एकाच वेळी एकदिवसीय आणि टी-20 या दोन्हीचे विश्वविजेतेपद पटकावले आहे.

इंग्लंडने 1992 च्या विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. 1992 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडचा पराभव केला होता. आता 30 वर्षांनंतर इंग्लंडने मेलबर्नमध्येच पाकिस्तानचा पराभव करून बदला पूर्ण केला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 8 गडी गमावून 137 धावा केल्या. पाकिस्तानची फलंदाजी फ्लॉप झाली. सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. शान मसूदने सर्वाधिक 38 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार बाबरने 32 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 19 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. बेन स्टोक्सने 49 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे त्याचे पहिले अर्धशतक होते.

इंग्लंड दुसऱ्यांदा टी 20 मध्ये चॅम्पियन बनला आहे. याआधी हा संघ 2010 मध्येही टी-20 चॅम्पियन बनला होता. तेव्हा इंग्लिश संघाचा कर्णधार पॉल कॉलिंगवूड होता. इंग्लंडचे हे एकूण तिसरे विश्वचषक विजेतेपद आहे. 2019 मध्ये, इंग्लंड संघ वनडे चॅम्पियन देखील बनला. त्याचवेळी पाकिस्तानची ही तिसरी फायनल ठरली. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी 20 विश्वचषकात पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच वेळी, 2009 मध्ये, ते T20 चॅम्पियन बनले. आता 2022 मध्ये पाकिस्तान संघाला फायनलमध्ये पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे आणि उपविजेते म्हणून समाधान मानावे लागले आहे.

पाकिस्तान प्लेइंग 11 :

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद हारिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी

इंग्लंड प्लेइंग 11 :

जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news