भारत आणि इंग्लंड ( England vs India day 3 ) यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात २७८ धावा केल्या. भारताकडे पहिल्या डावात ९५ धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून केएल राहुलने ८४ धावांची दमदार खेळी केली. तर जडेजाने ५६ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. याच बरोबर जसप्रीत बुमराह ( २८ ) मोहम्मद शमी ( १३ ) आणि मोहम्मद सिराजने ७ धावा करत बॅटने बहुमूल्य योगदान दिले. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने ४ तर ऑली रॉबिन्सनने ५ विकेट घेतल्या.
त्यानंतर इंग्लंडने आपला दुसरा डाव सुरु केला. मात्र ११.१ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने सुरुवात केली आणि खेळ थांबला. या पावसाने दुसऱ्या दिवसाप्रमाणे तिसऱ्या दिवशीही तिसरे सत्र वाया घालवले. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडच्या ११.१ षटकात बिनबाद २५ धावा झाल्या होत्या. रोरी बर्न्स ११ तर डॉमिनिक सिब्ले ९ धावा करुन नाबाद होते.
कसाबसा दोन षटकांचा खेळ झाला नाही तोपर्यंत पावसाने पुन्हा सुरुवात केली. त्यामुळे खेळ थांबवावा लागला खेळ थांबला त्यावेळी भारताने ४८.३ षटकात ४ बाद १३२ धावा केल्या होत्या.
त्यानंतर पावसाने उसंत दिल्याने पुन्हा खेळ सुरु झाला. दरम्यान, पंतने आक्रमक फटके मारत भारताची धावगती वाढवण्यास सुरुवात केली. मात्र रॉबिन्सनने त्याची २० चेंडूत २५ धावांची खेळी संपवली आणि भारताला पाचवा धक्का दिला. पंत बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
या दोघांनी इंग्लंडची पहिल्या डावातील आघाडी कमी करण्यास सुरुवात केली. ६४ व्या षटकात भारताने इंग्लंडची १८३ ही धावसंख्या पार केली. यानंतर राहुल आणि जडेजाने आघाडी मिळवण्यास सुरुवात केली. लंचपर्यंत या दोघांनी भारताला ८ धावांची आघाडी मिळवून दिली होती.
लंचनंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजाने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. याचबरोबर भारताने २०० धावांचा टप्पा पार केला. पण, हा आनंद फार काळ टिकला नाही. अँडरसने शतकाच्या वाटेवर असलेल्या राहुलला ८४ धावांवर बाद केले. याचबरोबर अँडरसनने अनिल कुंबळे यांना सर्वाधिक कसोटी विकेट्स च्या यादीत मागे टाकले. आता अँडरसन ६२१ विकेट घेत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे.
राहुल नंतर आलेल्या शार्दुललाही फलंदाजीत आपली चमक दाखवता आली नाही. तोही अँडरसनच्या भेदक माऱ्याची शिकार ठरला. शार्दुल बाद झाल्यानंतर जडेजाने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याने ८१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या अर्धशतकाबरोबरच भारताने पहिल्या डावातील आघाडी ५० च्या जवळ पोहचवली.
मात्र आक्रमक फटके मारण्याच्या नादात जडेजा ५६ धावांवर बाद झाला. जडेजा बाद झाल्यानंतर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने भारताला २५० चा टप्पा पार करुन देण्याचा प्रयत्न केला. पण, शमी १३ धावा करुन बाद झाला. त्यानंतर सिराज आणि बुमराहने अखेरची फटकेबाजी सुरु करत भारताला २५० टप्पा पार करुन दिला. या दोघांनी शेवच्या विकेटसाठी २५ चेंडूत ३३ धावांची खेळी करत भारताला ९५ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. अखेर ही भागीदारी रॉबिन्सनने मोडत भारताचा पहिला डाव २७८ धावांवर संपवला.
England vs India day 3 Live Update :
तिसऱ्या दिवसाचे तिसरे सत्रही पावसात गेले वाहून, दिवसाचा खेळ संपला
सामन्यात पावसाचा व्यत्यय, इंग्लंडच्या ११.१ षटकात दुसऱ्या डावात बिनबाद २५ धावा
चहापानापर्यंत इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ६ षटकात बिनबाद ११ धावा
भारताचा पहिला डाव २७८ धावात संपला, भारताकडे ९५ धावांची आघाडी
पाहा व्हिडिओ : नंदवाळमध्ये विठ्ठल कसे प्रकटले?
https://youtu.be/vuXFVV0uhNs