England Team : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

England Team : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : England Team : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने 16 सदस्यीय संघाची घोषणा सोमवारी केली. अष्टपैलू बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणारा इंग्लिश संघ बॅझ बॉलची रणनीती भारतातही पुढे नेणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

जोस बटलर, सॅम कुरनला डच्चू (England Team)

स्टार अष्टपैलू सॅम कुरन आणि यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर यांना या संघात स्थान मिळालेले नाही. मात्र, संघात तीन नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात शोएब बशीर, टॉम हार्टले आणि गस ऍटकिन्सन यांचा समावेश आहे. ओली पोप या संघाचा उपकर्णधार आहे. इंग्लंडने टॉम हार्टले, जॅक लीच आणि रेहान अहमद या तीन फिरकीपटूंचा आपल्या संघात समावेश केला आहे.

इंग्लिश संघ जानेवारीमध्ये भारतात दाखल होईल. उभय संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये सुरू होणार आहे. यानंतर दुसरी कसोटी 2 फेब्रुवारीपासून विझागमध्ये, तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये, चौथी कसोटी 23 फेब्रुवारीपासून रांचीमध्ये आणि शेवटची कसोटी 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळवली जाईल.

'असा' आहे इंग्लंडचा संघ (England Team)

जो रूट, जॉनी बेअरस्टो (विकेटकीत्पर), हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, बेन फॉक्स (विकेटकीपर) आणि ऑली पोप यांच्या रूपात नऊ फलंदाज आहेत. टॉम हार्टले, जॅक लीच आणि रेहान अहमद हे तीन फिरकीपटू आहेत. वेगवान गोलंदाजीमध्ये जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, ऑली रॉबिन्सन आणि मार्क वुड यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

पहिली कसोटी : भारत विरुद्ध इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद
दुसरी कसोटी : भारत विरुद्ध इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विझाग
तिसरी कसोटी : भारत विरुद्ध इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट
चौथी कसोटी : भारत विरुद्ध इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची
पाचवी कसोटी : भारत विरुद्ध इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news