T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंग्लंडची घोषणा, ‘या’ 15 खेळाडूंना मिळाले स्थान

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंग्लंडची घोषणा, ‘या’ 15 खेळाडूंना मिळाले स्थान
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. गतविजेत्या इंलिश संघाचे नेतृत्व जोस बटलरकडे असेल. अनुभवी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे इंग्लंड संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे आर्चर अनेक दिवस इंग्लंड संघाबाहेर होता. आर्चर मे २०२३ मध्ये इंग्लंडकडून शेवटचा खेळला होता, तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. आर्चरचे वर्षभरानंतर इंग्लंड संघात पुनरागमन झाले आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघातील फलंदाजांमध्ये जोस बटलर, विल जॅक, फिल सॉल्ट आणि जॉनी बेअरस्टो यांचा टॉप ऑर्डरमध्ये समावेश करण्यात आला आहे, तर अनुभवी अष्टपैलू मोईन अलीसह बेन डकेटचा संघात समावेश आहे. याशिवाय हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. यासह आदिल रशीद आणि टॉम हार्टली यांचा फिरकीपटू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. (T20 World Cup 2024)

टी-20 विश्वचषकात इंग्लंडला ब गटात ठेवण्यात आले आहे. या गटात इंग्लंडसह ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड आणि ओमान हे संघ आहेत. इंग्लंडचा संघ 31 मे रोजी वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे. त्यांचा पहिला सामना 4 जून रोजी बार्बाडोस येथे स्कॉटलंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. (T20 World Cup 2024)

टी-20 विश्वचषक 2024 साठी इंग्लंडचा संघ :

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली (उपकर्णधार), फिल सॉल्ट, विल जॅक, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, मार्क वुड, रीस टोपली, आदिल रशीद, टॉम हार्टले, बेन डकेट.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news