“केरळमध्‍ये शत्रू तर बाहेर बेस्ट फ्रेंड्स…” : PM मोदींचा डाव्‍यासह काँग्रेसवर निशाणा

तिरुअनंतपुरममध्ये आयोजित सभेत  बोलताना पंतप्रधान नरेंद्र माेदी. 
तिरुअनंतपुरममध्ये आयोजित सभेत  बोलताना पंतप्रधान नरेंद्र माेदी. 

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस आणि डाव्‍यांचे एकच प्राधान्य म्‍हणजे कुटुंब. त्यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाला देशावर राज्य करू दिले. त्यांच्यासाठी कुटुंबाचे कल्याण हे भारतीयांच्या कल्याणापेक्षा श्रेष्ठ आहे. केरळमध्ये ते एकमेकांचे शत्रू आहेत; पण केरळच्या बाहेर ते कायमचे बेस्ट फ्रेंड्स आहेत, अशा शब्‍दांमध्‍ये आज (दि.२७) पंतप्रधान नरेंद मोदी यांनी काँग्रेससह भारतीय कम्युनिस्ट पक्षावर (सीपीआय) तोफ डागली. तिरुअनंतपुरममध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, "काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) हे केरळमध्‍ये एकमेकांवर हल्‍ला करतात. ते एकमेकांचे शत्रू आहेत; पण केरळच्या बाहेर ते बेस्‍ट फ्रेंड्स आहेत. काँग्रेसच्या युवराजाची वायनाडमधून हकालपट्टी व्हावी, अशी डाव्यांची इच्छा आहे. डावे आणि काँग्रेस यांचे आपल्‍या कुटुंबाचे कल्‍याण हे भारतीयांच्या कल्याणापेक्षा श्रेष्ठ आहे."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news