एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला जन्मठेपेची शिक्षा; उच्च न्यायालयाचा निर्णय

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला जन्मठेपेची शिक्षा; उच्च न्यायालयाचा निर्णय
Published on
Updated on

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. लखनभय्या फेक एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती डेरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. एकूण 16 याचिका या प्रकरणात सुनावणीसाठी आल्या होत्या. 8 नोव्हेंबर 2023 रोजी निकाल राखून ठेवला होता. तो मंगळवारी देण्यात आला. या निकालात 2006 मध्ये झालेल्या लखनभय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्माला दोषी ठरवले आहे.

राम नारायण गुप्ता ऊर्फ लखनभय्या हा गँगस्टर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा जवळचा हस्तक होता. मुंबईत तो छोटा राजनसाठी काम करत होता. प्रदीप शर्मा आणि त्याच्या पथकाने त्याचा चकमकीदरम्यान 2006 मध्ये एन्काऊंटर झाला होता. या प्रकरणात नेमलेल्या एसआयटी चौकशीत चकमक बनावट असल्याचे उघड झाले होते. शर्मासह मुंबई पोलिस दलातील 13 अधिकारी आणि पोलिसांना या प्रकरणात अटक केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news