व्‍हिडिओ : मुसेवाला हत्‍या प्रकरणातील गँगस्‍टरचा अमृतसरमध्‍ये खात्‍मा, पोलिस कर्मचार्‍यासह पत्रकार जखमी

व्‍हिडिओ :  मुसेवाला हत्‍या प्रकरणातील गँगस्‍टरचा अमृतसरमध्‍ये खात्‍मा, पोलिस कर्मचार्‍यासह पत्रकार जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंजाब पोलीस आणि गायक सिद्धू मूसेवाला यांच्‍या हत्‍या प्रकरणातील गँगस्‍टर यांच्‍यात आज अमृतसर येथे चकमक झाली. अद्‍यापही चिचा भकना गावात पोलिसांची कारवाई सुरु आहे. परिसरात नाकाबंदी करण्‍यात आली आहे. दरम्‍यान, २९ मे रोजी पंजाबमधील मानस जिल्‍ह्यात गायक सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या झाडून ह्‍त्‍या करण्‍यात आली होती. तेव्‍हापासून पोलीस या खुनातील आरोपींच्‍या मागावर होते, अशी माहिती पाेलीस सूत्रांनी दिली.

मुसेवाला हत्‍या प्रकरणातील गँगस्‍टर चिचा भकना गावात आश्रय घेतला असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी गावाला गेढा दिला. हे गाव पाकिस्‍तान सीमेजवळील अटारी परिसरात आहे. यावेळी गँगस्‍टरने पोलिसांवर एके४७ रायफलमधून गोळीबार केला होता. पोलिसांनीही त्‍याला चोख प्रत्‍युत्तर दिले. गोळ्‍याच्‍या आवाजाने गावात एकच खळबळ माजली.

पोलिसांच्‍या प्रत्‍युत्तरात एक गँगस्‍टर मारला गेला असून, दुसर्‍याला जिंवत पकडण्‍याचा पोलीस प्रयत्‍न करत असल्‍याचेा सूत्रांनी सांगितले. दरम्‍यान, चिचा भकना गावात झालेल्‍या चकमकीत एक पत्रकराही जखमी झाला आहे. अद्‍याप आमची कारवाई सुरु आहे, असे पाेलीस अधिकारी सुखबीर सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news