पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस ओटीटी २' चा विजेता एल्विश यादवला ( Elvish Yadav ) नोयडा पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर त्याला न्यायायल्यात नेले असता वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत न्यायाल्याने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ड्रग्ज ( रेव्ह) पार्ट्यांमध्ये सापांचे विष पुरविल्याच्या आरोपावरून त्याच्यासह इतर ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान एल्विशच्या कार्यक्रमात पोलिसांनी छापा टाकल्यानंतर तो फरारी झाली होता. यावेळी त्याच्या पाच साथीदारांना नोयडा पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर आता एल्विशला अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका संशयित रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप असलेल्या यूट्यूबर एल्विश यादव ( Elvish Yadav ) याच्यावर होता. फॉरेन्सिक अहवालांनी यापूर्वी 3 नोव्हेंबर रोजी नोएडाच्या सेक्टर 51 मधील बँक्वेट हॉलमध्ये आयोजित केलेल्या पार्टीतून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये सापाच्या विषाच्या उपस्थितीची पुष्टी केली होती.
एल्विश यादव आणि इतर सहा जणांवर वन्यजीव (संरक्षण) कायदा आणि आयपीसी कलम १२०ए (गुन्हेगारी कट) च्या तरतुदींचा आरोप ठेवण्यात आला आहे.
मेनका गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या एका संस्थेने, एल्विश यादव हा ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचे विष पुरवत असून तो त्याचे व्हिडिओदेखील शूट करत असल्याची माहिती समोर आणली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका व्यक्तीच्या मदतीने रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यासाठी एल्विशला संपर्क साधला होता. यानुसार एल्विश त्याच्याकडील विषारी सापांना घेवून आला होता. दरम्यान पोलिसांनी छापा टाकत राहुल, टीटूनाथ. जयकरण, नारायन आणि रविनाथ या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, एल्विशचा तपास सुरू आहे.