‘न्यूरालिंक’ने मानवी मेंदूमध्ये बसवली चिप : एलन मस्‍क यांची घोषणा

अब्जाधीश एलन मस्क. संग्रहित छायाचित्र.
अब्जाधीश एलन मस्क. संग्रहित छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मानवी मेंदूमध्ये चिप बसवण्याची (प्रत्यारोपन) पहिली चाचणी यशस्वी झाल्याची घाेषणा अब्जाधीश एलन मस्क यांनी केली आहे. मस्‍क यांची कंपनी न्युरालिंक ही मानवी मेंदूमध्‍ये चिप प्रत्‍याराेपनाची चाचणी सुरु होती. ज्या व्यक्तीच्‍या मेंदूत चिप बसवली त्‍याच्‍या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती मस्क यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली आहे. (elon musk neuralink announce seccessful implant chip in human brain )

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून चाचणीसाठी मिळाली होती परवानगी

मानवी मेंदूमध्ये चिप प्रत्यारोपित करण्यासाठी न्यूरालिंकला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मे 2023 मध्‍ये मान्यता दिली होती. एका पॅरालिसिस झालेल्या रग्णावर चाचणी घेण्याची त्यांना परवानगी मिळाली आहे. आता ही चाचणी यशस्‍वी झाल्‍यानंतर मस्क यांनी म्‍हटलं आहे की, या चाचणीचे सुरुवातीचे निकाल खूपच उत्साहवर्धक आहेत. न्यूरालिंकच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, स्वतंत्र संस्थात्मक पुनरावलोकन मंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. PRIME (प्रिसाइज रोबोटिकली इम्प्लांटेड ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस) या वैद्यकीय उपकरणाची चाचणी, ज्यामध्ये वायरलेस ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेसची चाचणी घेण्यात आली होती. ती यशस्वी झाली. या चाचणीचा उद्देश मानवी मेंदूमध्ये चिप बसवण्याच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करणे हा होता. (elon musk neuralink announce seccessful implant chip in human brain )

दिव्‍यांगसाठी महत्त्‍वपूर्ण संशाेधन

एलन मस्क, काही शास्त्रज्ञ आणि अभियंते यांनी 2016 मध्ये सुरू केलले एक स्टार्टअप अशी न्यूरालिंक कंपनीची ओळख आहे. ही कंपनी ब्रेन चिप इंटरफेस तयार करण्याचे काम करते. न्यूरॉन्स सेल्स हे इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिग्नलचा वापर करुन मेंदू आणि शरीरात माहिती पोहोचवत असतात. या चिपचे मानवी कवटीत रोपण केले जाऊ शकते.चिप्सच्या मदतीने चालणे, बोलणे किंवा पाहू न शकणारे दिव्‍यांग लोक पुन्हा काही प्रमाणात चांगले जीवन जगू शकतील, असा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आला होता. (elon musk neuralink announce seccessful implant chip in human brain )

प्रयोगशाळेत प्राण्यांवर चिप चाचणी करण्‍यात आल्‍याने कंपनीवर जोरदार टीकाही झाली होती. तसेच २०२२मध्‍ये अमेरिकेच्या केंद्रीय चौकशीलाही सामोरे जावे लागले होते. चाचणी दरम्यान कंपनीने 1500 प्राणी मारल्याचा आरोप आहे. मात्र, कंपनीने हे आरोप फेटाळून लावले होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news