मस्क यांनी मुलाला खांद्यावर घेऊन घेतली हंगेरीच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

मस्क यांनी मुलाला खांद्यावर घेऊन घेतली हंगेरीच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

टेक्सास, वृत्तसंस्था : टेस्लाचे सीईओ अ‍ॅलन मस्क यांनी टेक्सासमधील गीगा फॅक्टरीमध्ये मुलाला खांद्यावर घेऊन हंगेरीच्या राष्ट्राध्यक्ष कॅटलिन नोव्हाक यांची भेट घेतली. दोघांच्यात पाश्चिमात्य जगतात लोकसंख्येत होत असलेल्या घसरणीवर चर्चा झाली. या भेटीचे फोटो नोव्हाक यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट केले आहे.

मुलांना जन्माला न घालणे ही समस्या आमची चिंता वाढवणारी असल्याचे नोव्हाक यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. यानंतर मस्क यांनीही हे फोटो रिपोस्ट केले आहेत. मुलांना जन्माला घालून जगाला वाचवण्याची गरज असल्याचे मस्क यांनी पोस्ट केली आहे. नुकतेच मस्क यांनी जागतिक नेत्यांची भेट घेतली आहे.

नोव्हाक म्हणाल्या की, वाढत्या तापमानवाढीइतके घटत्या लोकसंख्येच्या समस्येकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाहीत. तरुणांना मुलांना जन्माला घालण्यास प्रोत्साहित करण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news