Elon Musk : एलन मस्क यांचे ट्विटरवर एका दिवसात ८ लाख फॉलोअर्स वाढले; जस्टिन बीबरला टाकले मागे

Elon Musk : एलन मस्क यांचे ट्विटरवर एका दिवसात ८ लाख फॉलोअर्स वाढले; जस्टिन बीबरला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्पेस एक्स आणि टेस्लाचे मालक असलेले एलन मस्क आता ट्विटरचेदेखील मालक आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने ट्विटर विकत घेतल्यापासून जगभरात त्याची चर्चा होत आहे. ज्या दिवसापासून त्यांनी ट्विटरचा ताबा घेतला, त्या वेळीपासून मस्क यांनी ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महत्त्वाचा बदल म्हणजे ब्लू टिक सबस्क्रिप्शनसाठी ठराविक शुल्क आकारले जाणार आहे. एलन मस्क हे ट्विटरचे सीईओ बनल्यानंतर त्यांच्या फॉलोअर्समध्येही कमालीची वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणजे आतापर्यंत सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या काही सेलिब्रिटींचे ट्विटरवरील फॉलोअर्स देखील कमी होतना दिसत आहेत.

एलन मस्क यांनी २७ ऑक्टोबर रोजी ट्विटरचा ताबा घेतला. ट्विटर कंपनी बॉस बनल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ट्विटरवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या ८ लाखांनी वाढली. त्यानंतरही मस्क यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज लाखोंच्या संख्येने त्यांचे ट्विटरवरील फॉलोअर्स वाढत असल्याचे, सोशल ब्लेड नावाच्या वेबसाईटने दिलेल्या आकडेवारीनुसार दिसते. सोशल ब्लेड ही वेबसाइट विशेषतः सोशल मीडियाशी संबंधित डेटा देण्याचे काम करते.

मस्क यांच्या फॉलोअर्सच्या संख्येतील वाढ अद्याप तरी थांबलेली नाही. 29 ऑक्टोबर रोजी त्यांचे 6 लाख फॉलोअर्स आणखी वाढले. त्यानंतर 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी मस्कच्या फॉलोअर्समध्ये अनुक्रमे 4-4 लाखांनी वाढ झाली आहे.

सेलिब्रेटींनादेखील टाकले मागे

सोशल ब्लेड वेबसाईटनुसार, आतापर्यंत ट्विटरवर जे सेलिब्रिटी टॉपवर होते, त्यांचे फॉलोअर्स सध्या कमी होत आहेत. यामध्ये 133.4 दशलक्ष फॉलोअर्ससह ट्विटरवर अव्वल असलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या फॉलोअर्समध्ये 38 हजारांनी घट झाली आहे. एलन मस्क आत्ता ट्विटरवर बराक ओबामा यांच्यानंतर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे व्यक्ती आहेत. मस्क यांच्या फॉलोअर्सची संख्या सध्या 114.1 दशलक्ष इतकी झाली आहे. याआधी या स्थानावर जस्टिन बीबर हा प्रसिद्ध गायक होता. ज्याचे ट्विटरवर 113.8 दशलक्ष फॉलोअर्स होते. एलन मस्क यांच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाल्यानंतर, सर्वाधिक फॉलोअर्स असणारा जस्टिन बीबर आता ट्विटरवरील तिसऱ्या स्थानावर असणारा सेलिब्रिटी आहे. गेल्या काही दिवसात त्याचे फॉलोअर्स १ लाखांनी कमी झाले आहेत.

५७ लाखांनी फॉलोअर्स वाढले

अहवालानुसार गेल्या एका महिन्यात मस्क यांच्या फॉलोअर्समध्ये ५७ लाखांनी वाढ झाली आहे. मस्क ट्विटरचे सीईओ बनल्यापासून ते ट्विटरला फायदेशीर बनवण्यासाठी मोठे बदल करत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात एलॉन मस्क जगभरात प्रचंड चर्चेत असल्याने त्यांच्या फॉलोअर्समध्ये देखील मोठ्या प्रमाणाक वाढ झाल्याचे दिसत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news