Elephants : दुर्मिळ आजारामुळे आफ्रिकेत ३५० जंगली हत्तींचा मृत्यू; बोट्सवाना आणि झिम्बाब्वेमधील प्रकार

Elephants
Elephants

पुढारी ऑनलाईन डेस्क : मे आणि जून २०२२ मध्ये ३५० हून अधिक हत्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे शास्त्रज्ञ आणि संशोधकांना मोठा धक्का बसला. आफ्रिकन देशांच्या उत्तर-पश्चिम भागात टस्कर्स जातीचे हे हत्ती मृत अवस्थेत आढळले होते. दरम्यान, या हत्तींची कोणी शिकारही केली नव्हती. तशी कोणतीही जखम हत्तीच्या अंगावर दिसत नव्हती.

या घटनेचा इतर हत्तींवर गंभीर परिणाम झाला होता. ते तोंडावर खाली कोसळत होते. वर्तुळात चालण्याचा प्रकार त्यांनी सुरु ठेवला होता. यानंतर सुमारे दोन महिन्यांनी झिम्बाब्वेच्या उत्तरेकडील प्रदेशातही ३५ हत्तींना असाच प्रकार सहन करावा लागत होता.

संशोधन काय सांगते?

'गार्डियन'ने दिलेल्या माहितीनुसार, बोट्सवानामध्ये हत्तींचा मृत्यू अज्ञात सायनोबॅक्टेरियल विषामुळे झाला आहे, असे सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, इतर कोणतीही माहिती उघड झाली नाही. दरम्यान, हत्तींवरील संशोधनातून हत्तींचा मृत्यू कशामुळे झाला? हे समोर आले. हत्तींच्या अचानक मृत्युंचे कारण पाश्चरेला बिस्गार्ड टॅक्सन ४५ नावाचा जीवाणू होता. ज्यामुळे रक्तामध्ये विषबाधा होते. हत्तींच्या मृत्यूशी जिवाणूच्या संसर्गाचा संबंध यापूर्वी नव्हता. शेजारील देशांमध्ये मृत्यूचे कारण हेच असू शकते, असे संशोधकांचे मत आहे. संशोधकांनी त्यांच्या अहवालात हत्तींच्या मृत्युबाबत अनेक दावे केले आहेत, असे नेचर कम्युनिकेशन्सच्या जर्नल पेपरमधून स्पष्ट झाले आहे.

आफ्रिकेतील सवाना जातीचे हत्ती ८ टक्के दराने कमी होत आहेत. हत्तींची होत असलेली शिकार हे यामागील मुख्य कारण आहे. या अभ्यासात पुढे असे सुचवण्यात आले आहे की, हत्ती कमी होत असल्याचे कारण संसर्गजन्य जिवाणू देखील आहे. आता फक्त 350,000 जंगलात उरले आहेत.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news