Union Budget: ३८,८०० शिक्षक-कर्मचाऱ्यांची भरती : अर्थमंत्री सीतारामन यांची मोठी घोषणा

nirmala sitharaman
nirmala sitharaman

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा त्यांचा सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. संपूर्ण जगाच्या नजरा मोदी सरकारच्या बजेटकडे लागल्या आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • देशात ५० नवीन विमानतळांची उभारणी करणार.
  • हाताने मैला उचलण्याची पद्धत बंद करणार, मशीनद्वारे मैला उचलला जाण्याची नवी योजना आणली जाणार आणि युद्धपातळीवर या योजनेची अंमलबजावणी करणार.
  • अर्थसंकल्पीय भाषण सुरू असताना नव्या योजनांवर सत्ताधाऱ्यांकडून 'मोदी, मोदी'च्या घोषणा केल्या जात असताना विरोधकांकडून 'भारत जोडो'च्या घोषणा देण्यात आल्या. काही विरोधकांनी विरोधकांच्या बाजूचा कॅमेरा बंद असल्याचीही तक्रार केली.
  • पायाभूत सुविधांमधील भांडवली गुंतवणुकीत ३३ टक्क्यांनी वाढ करून ती १० लाख कोटींपर्यंत नेण्यात आली आहे. ही रक्कम एकूण जीडीपीच्या ३.३ टक्के आहे.
  • २.४० लाख कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद.
  • पुढच्या ३ वर्षांत केंद्राकडून ३८,८०० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती करेल. साडेतीन लाख विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेतात.
  • शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आयुष, मत्स्य, पशुपालन, डेअरी, सहकार अशा मंत्रालयांची स्थापना केली.
    मत्स्य विकासासाठी ६ हजार कोटींची विशेष तरतूद.
  • ० ते ४० वयोगटातील सिकल सेल एनिमियाचं उच्चाटन करण्यासाठी केंद्रीय मंत्रालये आणि राज्य सरकारांच्या सहकार्याने संयुक्त प्रयत्न करण्यात येतील.
  • सहकारातून समृद्धी साध्य करण्यासाठी नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ६३ हजार प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं संगणकीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय सहकार डेटाबेस तयार करण्यात आला. यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीत स्टोरेज सुविधा निर्माण करण्यात येतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news