पुण्यातून दसरा मेळाव्याला आठ हजार शिवसैनिक जाणार

पुण्यातून दसरा मेळाव्याला आठ हजार शिवसैनिक जाणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेच्या मुंबईत होणार्‍या दसरा मेळाव्यासाठी पुण्यातून सात-आठ हजार कार्यकर्ते जाणार असून, त्याचे नियोजन करण्यात येत आहे. राजकीय वातावरण तापल्यास, पुण्यातून यापेक्षाही अधिक शिवसैनिक मुंबईला पोहोचण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे आणि संजय मोरे यांनी ही माहिती मंगळवारी दिली. ते म्हणाले, दरवर्षीच दसरा मेळाव्याला पुण्यातून अनेक शिवसैनिक जातात. यावर्षी सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची संधी शिवसैनिकांना मिळणार आहे. त्यामुळे शाखापातळीवर त्याचे नियोजन करण्यात येत आहे. शिवसेनेच्या प्रत्येक शाखेतून कार्यकर्ते एकत्रितरीत्या मेळाव्यासाठी जाण्याची तयारी करू लागले आहेत.

शिवसेनेच्या दृष्टीने दसरा मेळावा हा महत्त्वाचा असतो. त्याला यंदा परवानगी मिळणार की नाही, याची चर्चा सुरू असली, तरी मेळावा निश्चितपणे होणार आहे. त्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याच्या उद्देशाने आम्ही तयारी सुरू केली असल्याचे थरकुडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news