पुढारी ऑनलाईन डेस्क : किंग चार्ल्स III यांच्यावर तीन अंडे फेकल्याप्रकरणी बुधवारी (दि.९) एकास अटक करण्यात आली आहे. किंग्स चार्ल्स यॉर्क सिटीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. द वाशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने अंडे फेकत असताना घोषणाही दिल्या होत्या. 'हा देश गुलामांच्या रक्ताने बनला होता', अशा घोषणा या व्यक्तीने दिल्या आहेत.
दरम्यान, चार्स यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि ते पुढे चालत राहिले. किंग्स चार्ल्स हे त्यांची आई राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यासाठी आले होते. या वेळी हा प्रकार घडला. द वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार,इंग्लंडचे राजघराणे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले आहे. या वर्षाच्या सुरूवातीला, प्रिंस विलियम आणि त्यांच्या पत्नी करेबियन देशाच्या दौऱ्यावर असताना अनेक कार्यकर्त्यांनी राजेशाहीवरुन माफी मागण्याचे आवाहन केले होते.
नवनियुक्त राजाला विरोधाला सामोरे जाण्याचा हा पहिलाच प्रसंग नव्हता. राणी एलिझाबेथ यांचे निधन झाल्यानंतर काही दिवसांनी विरोध करत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यापूर्वीही इंग्लंडच्या महाराणी न्यूझीलंड दौऱ्यावर असताना एका महिलेने त्यांच्यावर अंडे फेकले होते. १९८६ दरम्यान ही घटना घडली होती.