मराठा आरक्षण मिळू नये यासाठी जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न : मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षण मिळू नये यासाठी जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न : मनोज जरांगे पाटील
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नका. मात्र आरक्षणाची लढाई शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्यासाठी दि 1 डिसेंबर पासून गाव तिथे साखळी उपोषण सुरू करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. सकल मराठा समाज खराडी-चंदननगर, पुणे शहर जिल्ह्याच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षण मिळू नये म्हणून मराठा आणि ओबीसी यांच्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र आपण संयम ठेवा.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलन उभं करण्यात आलं. याआधी मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी दोन वेळा उपोषण केलं. दुसरं उपोषण मागे घेताना त्यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला. तोपर्यंत जरांगे पाटील हे राज्यभर फिरून मराठा बांधवांच्या भेटी घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान जागोजागी भव्य सभा घेतल्या जात असून ते जनतेशी संवाद साधत आहेत. आज खराडी येथील सभेत देखील जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठा बांधवांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यावर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले.

मनोज जरांगे म्हणाले की, 'मराठा आरक्षणाची लढाई खूप पिढ्यांपासून सुरू आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाजाने आरक्षणासाठी टोकाची झुंज दिली. मराठा समाज राज्य आणि देशासाठी लढत राहिला. मराठा माय-बापानं कधी जातीवाद केला नाही. सगळ्या जातींना आधार आणि पाठबळ देण्याचं काम माझ्या मराठा पिढ्यांनी केलं.माझ्या डोळ्यासमोर कोणत्याही जातीचा माणूस समोर आला तर मराठ्यांच्या नजरेत माणूसकी जिवंत होत असे. कधीच त्यांनी जात शोधली नाही. हातात आहे ते मोठ्या मनाने देण्याचं काम मराठ्यांनी केलं . प्रत्येकाच्या सुखात-दुखःत मराठे धावून गेले. कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे हे काळजीपूर्वक बघितलं. दुसऱ्याचं लेकरू उघडं पडू दिलं नाही. मराठे सढळ हाताने इतरांना देत राहीले. आरक्षण देताना ही, कधीही भेदभाव केला नाही. कोणाला मिळाले आणि आम्हाला का मिळाले नाही याविषयी ब्र शब्द काढला नाही. गोरगरिबांच्या लेकरांचे कल्याण होत असेल तर आडवं पडायचं नाही ही मराठ्यांची प्रामाणिक भावना आहे. स्वतःचं आरक्षण असतानाही दुसऱ्याला दिलं. तरीही मराठे कधीही तुम्ही घेऊ नका असे म्हणाले नाही.

जरांगे म्हणाले की, आम्ही देताना कधी मागे पुढे पाहीले नाही. आज ही आमचा हात मदत करताना मागे घेत नाही. बापजाद्यांच्या संस्कारावर पाऊलावर पाऊल ठेऊन आमची वाटचाल सुरु आहे. ७५ वर्षात सर्व नेत्यांना मोठे करण्याचे काम मराठ्यांनी केले. आज ही सर्व पक्षातील नेत्यांना मराठे मोठे करत आहेत. आरक्षणापायी मराठ्यांच्या घरातील लेकरु त्रास सहन करत आहे. पण ज्यांना मोठे केले ते मदतीला येत नाही. मराठ्यांची लेकरं नोकरीसाठी वणवण भटकत असताना कोणी मदतीला पुढे येत नाही. मराठा समाज्याची लेकरं टाहो फोडत आहे. कोणीतरी आमची हाक ऐका. पण कोणी त्यांच्याकडे पहायला तयार नाही.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलन उभं करण्यात आलं. याआधी मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी दोन वेळा उपोषण केलं. दुसरं उपोषण मागे घेताना त्यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला. तोपर्यंत जरांगे पाटील हे राज्यभर फिरून मराठा बांधवांच्या भेटी घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान जागोजागी भव्य सभा घेतल्या जात असून ते जनतेशी संवाद साधत आहेत. आज खराडी येथील सभेत देखील जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठा बांधवांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यावर हल्लाबोल केल्याचे पाहयला मिळाले.

आपल्या बापजाद्यांनी ज्यांना मोठे केले तेच आज आपल्या समोर आहेत. तेच म्हणतायेत मी तुम्हाला आरक्षण मिळु देणार नाही. मराठ्यांचे पुरावे असताना ही नाही म्हणून सांगितले जायचे. ज्या-ज्या समित्या झाल्या त्यांनी सांगितले पुरावे सापडत नाहीत. त्यावर आजपर्यंत मराठ्यांनी विश्वास ठेवला, ७५ वर्षांनी आज २०२३ मध्ये मराठा समाजाचे पुरावे सापडायला लागले आहेत. त्यावेळी कोणते पुरावे घेतले नाहीत. नोंदी नाहीत. कागदपत्रं नाहीत. तरीही त्यांना आरक्षण दिलं गेलं. त्यावेळी व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं गेलं. मग मराठ्यांना आरक्षण का नाही. मंडल कमिशनने जी जात ओबीसी मध्ये घातली, त्याची पोटजात म्हणून आणखी एक जात घातली. मग, मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? नितीन करीर यांना मराठा आरक्षणासंर्दभातील एका समितीचे अध्यक्ष केले. तीन महिन्यात त्यांना रिपोर्ट द्यायचा होता. पण करीर यांना माहीतच नव्हते ते समितीचे अध्यक्ष आहेत, असेही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news