कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खाद्यतेलाचे दर कमी होण्याचे संकेत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खाद्यतेल व तेलबियांचा दर कमी होत असून त्याचा विचार करता खाद्यतेल किलोमागे 5 ते 8 रुपयांनी स्वस्त होऊ शकते, असे व्यापार्यांचे म्हणणे आहे. दर कमी झाल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. यामुळे खाद्यतेलाची मागणी आहे.
केंद्र सरकारने दोन वर्षांपासून खाद्यतेलाचे द र आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. त्यासाठी आधारभूत किमतींवर सोयाबीन, सूर्यफूल खरेदी आणि सूर्यफूल, सोयाबीनच्या आयातीत वाढ सुरू ठेवली आहे. यामुळे दर आटोक्यात राहून ग्राहकांना दिलासा मिळत आहे.
खाद्यतेलाचा पुरवठा अद्याप वाढलेला नाही. पण, घाऊक बाजारात तेलाची मागणी वाढली आहे. सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी हैराण आहे. सध्या किमान आधारभूत किमतीपेक्षा सोयाबीनचा भाव कमी आहे. बाजारात सध्या सोयाबीन आणि तिळाच्या तेलाचा साठा असल्याचे समोर आले आहे. तसेच आयात तेलबियांपासून बनवलेल्या खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याने बाजारात खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सध्याचे दर
सरकी 120 ते 125 रु. किलो. सूर्यफूल 110 ते 125 रु. किलो. शेंगतेल 185 ते 220 रु. किलो.