झारखंडचे मुख्‍यमंत्री सोरेन यांच्‍या निकटवर्तींवर ‘ईडी’चा छापा; सापडल्‍या दोन AK-47 रायफल!

झारखंडचे मुख्‍यमंत्री सोरेन यांच्‍या निकटवर्तींवर ‘ईडी’चा छापा; सापडल्‍या दोन AK-47 रायफल!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : झारखंडचे मुख्‍यमंत्री हेमंत सोरेन यांच्‍या निकटवर्तींच्‍या निवासस्‍थानावर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) छापा टाकला. प्रेम प्रकाश असे कारवाई करण्‍यात आलेल्‍या नाव असून, धक्‍कादायक बाब म्‍हणजे त्‍याच्‍या घरी दोन AK-47 रायफल मिळाल्‍याचा खुलासा 'ईडी'च्‍या सूत्रांनी केला आहे.

झारखंडमधील स्‍थानिक माध्‍यमांनी दिलेल्‍या मातिहीनुसार, सापडलेल्‍या AK-47 रायफल संदर्भात 'ईडी'ने राष्‍ट्रीय सुरक्षा संस्‍थेला (एनआयए) माहिती दिली आहे. कारवाई करण्‍यात आलेल्‍या प्रेम प्रकाश हे हेमंत सोरेन यांचे निकटवर्ती मानले जातात. या कारवाईमुळे झारखंडमधील राजकीय वुर्तळात खळबळ माजली आहे. याबाबत अद्‍याप हेमंत सोरेन यांनी खुलासा केलेला नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news