पुण्यातही मुश्रीफ यांच्या दोन मालमत्तांवर ईडीचे छापे, पुन्हा काही कागदपत्रे जप्त ?

पालकमंत्री हसन मुश्रीफ
पालकमंत्री हसन मुश्रीफ
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन येथील मालमत्तांवर सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी पहाटे छापे टाकून पुन्हा काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर इडीने बुधवारी पहाटे एकाचवेळी कारवाई करीत छापे टाकले. यापूर्वी अशाच प्रकारची कारवाई करून कागदपत्र जप्त करण्यात आली होती. ते प्रकरण सुरू असतानाच आज पुन्हा त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापा टाकण्यात आला. पुण्यातील दोन ठिकाणच्या मालमत्तांबरोबर कोंढवा येथील अशोका मुज सोसायटी आणि गणेशखिंड रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. कोंढवा भागात मुश्रीफ यांचे नातेवाईक राहायला असून त्यांच्याही घरातून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ईडी ने यापूर्वीही छापेमारी केली होती. त्यात काही मिळाले नसावे म्हणून त्यांनी पुन्हा ही कारवाई केली असावी असे वाटते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news