Immune System : ‘हे’ चार कडू पदार्थ वाढवतात रोगप्रतिकारक शक्ती

Immune System : ‘हे’ चार कडू पदार्थ वाढवतात रोगप्रतिकारक शक्ती

नवी दिल्ली ः स्वादिष्ट खाद्यपदार्थ खायला प्रत्येकालाच आवडते. पण, काही खाद्यपदार्थ हे चवीला चांगले नसतील; पण ते आपल्या तब्येतीसाठी लाभदायक असतात. आहारतज्ज्ञांनी अशाच काही कडवट चवीच्या पदार्थांची माहिती दिली आहे, ज्यांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत होते. ( Immune System )

हे पदार्थ असे

संबंधित बातम्या 

कारले

कारल्याची चव कितीही कडू असली तरी तब्येतीसाठी ते खूप चांगले असते. कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठीही कारले मदत करते.

कोको

कोकोत शक्तीशाली अँटि इनफ्लेमेंट्रीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असतो. तो कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास मदत करतो. ग्रीन टी – ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि पॉलिफेनॉल असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवी आणि हाडांना बळकट करण्यासाठी ग्रीन टीचे सेवन करणे फायदेशीर आहे.

लिंबाची पाने

फक्त लिंबूच नाही, तर लिंबाच्या पानांचाही आपल्या सुद़ृढ तब्येतीसाठी फायदा होतो. लिंबाच्या पानांची चव कडू असते. त्यामुळेच त्यात प्लेव्होनॉइड असते. प्लेव्होनॉइडचे काम हे फळांमधील किड्यांपासून संरक्षण करणे आहे. आंबट फळांच्या पानांना चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले गेले आहे. ( Immune System )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news