व्याधी लिव्हर सिरॉसीसची | पुढारी

डॉ. विजयकुमार माने

हिपॅटायटीसची कारणे वेगवेगळी असू शकतात. त्यापैकी AUTOIMMUNE हिपॅटायटीस नावाचा आजार होतो. व कालांतराने यकृत खराब होते. त्यास उीूिीेंसशपळल सिरॉसिस असं मानलं जातं. हा यकृताचा रोग झपाट्याने वाढतो. हा रोग जवळजवळ सर्व वयोगटातील लोकांना दिसू शकतो. याचे नेमके कारण काही वेळा दिसू शकत नाही. वेदनाशामक औषधांचा अवाजवी  वापर, कहीवेळा रुग्णाच्या ठराविक अवयवाविरुद्ध कारणाशिवाय निर्माण होणारी प्रतिकारशक्ती, ही कारणेही असू शकतात.

सर्वसाधारणपणे सुद़ृढ व्यक्ती यकृताचा 20 ते 25% वापर करतो म्हणूनच यकृतास होणारे आजार लवकर लक्षात येत नाहीत. यकृत निकामी होण्यास खूप मोठा कालावधी लागतो. सुरुवातीच्या काळात कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. 

Autoimmune hepatitis चे रूपांतर कालांतराने लिव्हर सिरॉसिस किंवा कॅन्सरमध्ये होऊ शकते. हिपॅटायटीस हा यकृताचा महत्त्वाचा आजार आहे. 

यामध्ये यकृताला सूज येते. व त्यामुळे यकृताकडून सामान्य कार्ये होण्यास अडथळा निर्माण होतो. या आजाराची कोणतीच लक्षणे सुरुवातीच्या काळात दिसत नाहीत. सुरुवातीच्या काळात पोटाची तपासणी केल्यास यकृताला सूज दिसून येते. नंतर मात्र यकृत छोटे होऊन ते तपासल्यावर यकृत हाताला लागेनासे होते. 

Autoimmune Hepatitis  प्रमाणेच hepatitis चे आणखी 2 प्रकार दिसून येतात. 

1. acute hepatitis – अचानक यकृताला सूज येते. आणि सहा महिन्यांत हा आजार आटोक्यात येणे शक्य असते. 

2. chronic hepatitis – हा संसर्ग 100 ते 150 मिलियन रुग्णांना जडतो. त्यामुळे यकृताचा कॅन्सर, यकृत निकामी होणे आणि त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणसुद्धा अधिक आहे. 

त्याच प्रमाणे Autoimmune condition यामध्ये यकृताजवळील रोग प्रतिकारक पेशी कमकुवत झाल्यास त्याचा परिणाम यकृताच्या कार्यावर होऊ शकतो. त्यालाच आपण Autoimmune hepatitis असे म्हणतो.

कावीळ हे यकृत आजाराचे मुख्य लक्षण असते. पित्तामध्ये असणार्‍या biluribin नावाच्या घटकामुळे शरीराचे विविध भाग पिवळे दिसायला लागतात त्यालाच आपण कावीळ असे म्हणतो. डोळ्यातील बुबुळ तपासून कावीळ आहे की नाही हे बघितलं जातं. biluribin चे प्रमाण जसे वाढते तसे डोळे, त्वचा, जीभ तोंडाचं आतलं आवरण पिवळे पडायला लागतात. biluribin वाढल्यामुळे अंगाला खाज सुटते. यकृत खराब झाल्याने प्रथिन उत्पादनाचं काम बंद होत.

Albumine चे शरीरातील प्रमाण कमी व्हायला लागत. त्यामुळे शरीरावर सूज येणे, पोटामध्ये व छातीमध्ये पाणी जमणे इ. लक्षणे रुग्णास  दिसू लागतात. पोटातील पाण्यामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव होऊन पोट दुखायला लागतं. प्रथिन पदार्थांच्या चयापचयाच्या क्रियेत बिघाड होतो. व शरीरातील अमोनियाचं प्रमाण वाढतं, त्यातून बेशुद्ध  होणे, असंबंध बडबडणे, रुग्णास गुंगी येणे इ. लक्षणे जाणवतात. पुरुषांमध्ये शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे स्तनांची वाढ होण्यास सुरुवात होते. यकृत लहान होत असताना प्लिहा (Spleen) वाढायला लागते. व त्यामध्ये रक्त जमा होऊन रक्तातील पेशी नष्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे रुग्णास Anemia, Thrombocytopenia इ. समस्या निर्माण होतात. या यकृताच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये किडनीवरसुद्धा परिणाम व्हायला लागतो. फुफ्फुसे खराब होऊ लागतात. प्रतिकारशक्ती कमी व्हायला लागते. व कोणत्याही कारणाने रुग्णाची तब्येत ढासळून त्याचा मृत्यू होतो. 

यकृताचा कोणताही आजार मग तो यकृताचा कॅन्सर असो, सिरॉसिस असो, हिपॅटायटीस 'इ' किंवा हिपॅटायटीस असो, प्रचलित औषध उपचारांनी तो बरा होत नाही व वारंवार ऍडमिट करून उपचार घ्यावे लागतात; पण मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांनी हा आजार OPD बेसिस चांगल्याप्रमाणे नियंत्रणात राहतो. modern homeopathy च्या उपचाराने सुरुवातीच्या काळापासून प्रतिकारशक्ती चांगली राहते. व इतर कोणतेही संसर्गजन्य आजार किंवा Autoimmune disease होण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रतिबंध होऊ शकतो. योग्य उपचारांबरोबर नियमित व्यायाम घेणे आवश्यक आहे. आहारामध्ये प्रोटीनयुक्त आहार दूध, अंडी, मासे प्रोटीन पावडर तसेच तंतुमय पदार्थ, कच्ची मोड आलेली कडधान्ये, पालेभाज्या, फळे यांचा जास्त प्रमाणात समावेश करावा. सैंधव मिठाचा वापर करावा. तेलकट, मसालेदार व तळलेले पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावे. मांसाहार पूर्णपणे टाळावा. अशा पद्धतीने योग्य आहार व modern homeopathy च्या औषध उपचारांनी हिपॅटायटीससारखा गंभीर आजार पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकतो. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news